• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • Rain Updates: पावसाचा कहर! मुसळधार पावसाचे 28 बळी, 15 हजारांहून अधिक नागरिक बेघर

Rain Updates: पावसाचा कहर! मुसळधार पावसाचे 28 बळी, 15 हजारांहून अधिक नागरिक बेघर

Rain Update News: राज्यांच्या अनेक भागांमध्ये पावसाचा (Rain Alert) जोर कायम होता.

 • Share this:
  नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर: पुन्हा एकदा देशातल्या काही राज्यांमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतोय. शनिवारी दक्षिणेकडील (South India Rains)राज्यांच्या अनेक भागांमध्ये पावसाचा (Rain Alert) जोर कायम होता. या पावसाचा फटका आंध्र प्रदेशला (Andhra Pradesh) सर्वाधिक बसला. आंध्र प्रदेशमध्ये पावसाशी संबंधित घटनांमध्ये सर्वाधिक जीवितहानी आणि तसंच बरीच नुकसान झालं आहे. दुसरीकडे, हवामान निरीक्षण संस्था स्कायमेटनं रविवारीही दक्षिणेकडील बहुतांश राज्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यासोबतच तामिळनाडू, कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेश सरकारांनी बचाव कार्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत. स्कायमेट हवामानानुसार, रविवारी तामिळनाडू (Tamil Nadu), कर्नाटक (Karnataka) आणि रायलसीमाच्या बहुतांश भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच आज केरळ (Kerala) , तामिळनाडू, अंदमान आणि निकोबार बेटे (Andaman and Nicobar Islands),किनारी आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) , दक्षिण छत्तीसगड, कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि तेलंगणा येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. यासोबतच ओडिशा, लक्षद्वीप, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. त्याचवेळी, केरळमधील सबरीमाला येथे पावसाचे प्रमाण कमी झाले होते, जिथे पथनामथिट्टा जिल्हा प्रशासनाने पावसामुळे तीर्थयात्रेवरील बंदी उठवली. दुसरीकडे, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या अनेक भागात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शुक्रवारपासून झालेल्या पावसामुळे आंध्र प्रदेशातील कडप्पा आणि अनंतपुरमु जिल्ह्यात किमान 25 जणांचा मृत्यू झाला असून पावसामुळे झालेल्या घटनांमध्ये 17 हून अधिक लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. हेही वाचा-  750 मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मोठी आर्थिक मदत करणार तेलंगणाचे CM; पंतप्रधानांना केली ही विनंती
   राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या एका सदस्याचाही मृत्यू झाला आहे. कडप्पा जिल्ह्यातील चेयेरू नदीला शुक्रवारी आलेल्या पुरात 30 हून अधिक लोक वाहून गेले, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. तिरुपती शहरातील परिस्थिती अजूनही भीषण आहे आणि अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत.
  Published by:Pooja Vichare
  First published: