• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • 750 मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मोठी आर्थिक मदत करणार तेलंगणाचे CM; पंतप्रधानांना केली ही विनंती

750 मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मोठी आर्थिक मदत करणार तेलंगणाचे CM; पंतप्रधानांना केली ही विनंती

ज्या कुटुंबीयांनी या आंदोलनादरम्यान आपल्या घरातील व्यक्ती गमावली आहे त्या कुटुंबांना तीन लाख रूपये नुकसान भरपाई दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री केसीआर यांनी शनिवारी केली.

 • Share this:
  नवी दिल्ली 21 नोव्हेंबर : केंद्र सरकारनं तीन कृषी कायदे (3 Farm Laws) रद्द केल्यानंतर आता तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (CM K Chandrashekhar Rao) यांनी मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री केसीआर शनिवारी म्हणाले की शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ते आर्थिक मदत करतील. त्यांनी अशी घोषणा केली आहे की ज्या कुटुंबीयांनी या आंदोलनादरम्यान आपल्या घरातील व्यक्ती गमावली आहे त्या कुटुंबांना तीन लाख रूपये नुकसान भरपाई दिली जाईल (3 Lakh Compensation for Kin of Those Who Died in Farmers' Agitation). यासोबतच त्यांनी केंद्र सरकारनेही पीडित कुटुंबीयांना कोणत्याही अटीशिवाय 25-25 लाख रुपये द्यावे, अशी विनंती केली आहे. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी केलेल्या या मोठ्या घोषणेची माहिती त्यांचा मुलगा केटीआर यांनी ट्विट करत दिली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की मागील एका वर्षात कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरू असताना अनेक शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्य गमावले आहेत. या आंदोलनात आपला जीव गमावणाऱ्या तब्बल 750 शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचा निर्णय तेलंगणा सरकारने घेतला आहे. तेलंगणा सरकारमध्ये मंत्री असलेले केटीआर म्हणाले, की आता केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द केले आहेत तर त्यांनी कोणत्याही अटीशिवाय शेतकऱ्यांविरोधात दाखल खटले मागे घ्यायला हवे. यासोबतच मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की केंद्र सरकारनंही शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यायला हवी. त्यामुळे सरकराने त्या शेतकरी कुटुबीयांना कोणत्याही अटीशिवाय २५-२५ लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, ज्यांच्या घरातील लोकांनी आंदोलनादरम्यान आपला जीव गमावला आहे. सीएम केसीआर यांच्या या घोषणेपूर्वी भाजप खासदारानेही या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. कृषी कायद्याच्या विरोधात झालेल्या शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे. पंजाब सरकारने पीडित शेतकरी कुटुंबांसाठी यापूर्वीच अनेक प्रकारची मदत जाहीर केली आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: