मराठी बातम्या /बातम्या /देश /आई तिच्या प्रियकरासोबत दिसली अन् मुलाचा सुटला संयम, उचललं भयानक पाऊल!

आई तिच्या प्रियकरासोबत दिसली अन् मुलाचा सुटला संयम, उचललं भयानक पाऊल!

घटनास्थळावरचा फोटो

घटनास्थळावरचा फोटो

एका तरुणाच्या आईचे एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते.

  • Local18
  • Last Updated :
  • Jharkhand, India

पवन कुमार राय, प्रतिनिधी

साहिबगंज, 21 मार्च : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मुलीच्या प्रेमप्रकरणाचा राग येऊन एका बापाने तिची गळा आवळून हत्या केली. कानपूरमधील ही घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

साहिबगंजमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईच्या अवैध संबंधाचा राग येऊन तरुणाने आईच्या प्रियकराची हत्या केली. हा तरुण कुठूनतरी घरी आला असता त्याला आई आणि तिचा प्रियकर एकत्र दिसले. त्यानंतर त्याचा संयम सुटला आणि त्याने प्रियकराला काठीने बेदम मारहाण केली. यानेही त्याचे समाधान झाले नाही, म्हणून त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केले. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना तालझारी पोलीस ठाणे हद्दीतील बडा जमनी ऊपर टोला येथील आहे. याठिकाणी रैला मरांडी याच्या पत्नीचे बऱ्हेत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोड धरण येथील रहिवासी असलेल्या मदन हेमब्रम याच्याशी काही काळापासून अनैतिक संबंध होते. दरम्यान, मदन कामानिमित्त काही काळ त्या गावात राहत होता. तो गावाचा सरपंच असलेल्या लखन सोरेन यांचा मेहुणा होता.

अनेकदा सांगूनही ऐकलं नाही, मुलगी बॉयफ्रेंडसोबत फोनवर दिसली, अन् बापानं थेट विषयच संपवला

येथील वास्तव्यादरम्यान त्यांची रैला मरांडी याच्या पत्नीशी ओळख झाली. यानंतर दोघेही फोनवर बोलू लागले आणि भेटू लागले. याप्रकारे त्यांचे सूत जुळले. दरम्यान, महिलेच्या कुटुंबीयांसह गावकऱ्यांनाही याची माहिती मिळाली. घरच्यांनीही अनेकदा विरोध केला होता. पण त्यामुळे दोघांनाही काही फरक पडला नाही. यामुळे महिलेचा मुलगा राजन मरांडी चांगलाच संतापला. मंगळवारी सकाळी जेव्हा मदन सोरेनला त्याच्या आईसोबत सापडला तेव्हा त्याचा संयम सुटला आणि त्याने त्याची हत्या केली.

दरम्यान, गावकऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी गावात पोहोचून या प्रकरणाचा तपास सुरू केला. स्टेशन प्रभारी प्रमोद तुडू यांनी सांगितले की, धारदार शस्त्राने हत्या झाल्याची माहिती मिळताच पोलीस तेथे आले. यावेळी मृतदेह जमिनीवर पडलेला आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले. तसेच आरोपी राजन याला अटक करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान त्याने आपला गुन्हाही मान्य केला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

First published:
top videos

    Tags: Jharkhand, Local18, Love story, Murder