मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /अनेकदा सांगूनही ऐकलं नाही, मुलगी बॉयफ्रेंडसोबत फोनवर दिसली, अन् बापानं थेट विषयच संपवला

अनेकदा सांगूनही ऐकलं नाही, मुलगी बॉयफ्रेंडसोबत फोनवर दिसली, अन् बापानं थेट विषयच संपवला

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

मुलीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. वडिलांना या प्रेमसंबंधांना विरोध होता.

  • Local18
  • Last Updated :
  • Kanpur Nagar, India

अखंड प्रताप सिंह, प्रतिनिधी

कानपूर, 21 मार्च : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. हत्या, आत्महत्या, तसेच प्रेम प्रकरणातून खुनाच्याही धक्कादायक घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मुलीच्या प्रेमप्रकरणाचा राग येऊन एका बापाने तिची गळा आवळून हत्या केली.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

उत्तरप्रदेशच्या कानपूरमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. त्याचबरोबर आरोपीच्या मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीच्या मुलीचे श्याम नगर येथील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, या प्रेमसंबंधाला मुलीच्या वडिलांचा विरोध होता. तो अनेक दिवसांपासून या प्रेमसंबंधाला विरोध करत होता. मात्र, अनेकदा नकार देऊनही मुलीने त्याचे ऐकले नाही.

अखेर घटनेच्या दिवशीही वडिलांनी तिला प्रियकरासोबत फोनवर बोलताना पकडले. यामुळे संतापलेल्या वडिलांनी त्याचा गळा दाबून खून केला. यानंतर या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून लोकांची चौकशी केली. तसेच आरोपी वडिलांना पोलिसांनी अटक केली असून, आरोपीने आपला गुन्हा मान्य केला आहे.

प्रेमापुढे झुकले गाव, निशा शाह आणि राजा प्रसादचं लागलं लग्न, गावकरी झाले वऱ्हाडी!

तर एडीसीपी पश्चिम लखन सिंह यादव यांनी सांगितले की, वडिलांनी आपल्या मुलीचा गळा दाबून खून केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचले. यानंतर मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. त्याचवेळी आरोपी वडिलांनी आपला गुन्हा कबूल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे, असे ते म्हणाले.

First published:
top videos

    Tags: Crime, Death, Local18, Love story, Murder, Uttar pradesh