मराठी बातम्या /बातम्या /देश /

भारताच्या राष्ट्रध्वजाचे शिल्पकार; पिंगली वेकय्या यांनी डिझाईन केला होता Indian National Flag

भारताच्या राष्ट्रध्वजाचे शिल्पकार; पिंगली वेकय्या यांनी डिझाईन केला होता Indian National Flag

Pingali Venkayya - news18 lokmat

Pingali Venkayya - news18 lokmat

पिंगली वेंकय्या हे आपल्या राष्ट्रध्वजाचे शिल्पकार आहेत. त्यांनीच आपल्या राष्ट्रध्वजाची डिजाईन तयार केली होती.

नवी दिल्ली, 25 जानेवारी: भारतीय राष्ट्रध्वजाचा (Indian National Flag) 1 एप्रिल 2021 रोजी शतक महोत्सवी वर्धापनदिन साजरा होणार आहे. 1 एप्रिल 1921 ला विजयवाडा येथे झालेल्या काॅंग्रेसच्या अधिवेशनात (Congress Meeting)  ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक पिंगली वेंकय्या (Pingali Venkayya) यांनी डिझाईन केलेल्या ध्वजाला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मान्यता दिली होती. त्यानंतर ध्वजामध्ये अशोक चक्र आणि तीन रंगाचा समावेश करुन बदल करण्यात आले आणि ऑगस्ट 1947 मध्ये राष्ट्रीय ध्वजास मान्यता देण्यात आली. जाणून घ्या कोण होते पिंगली वेंकय्या... पिंगली वेंकय्या यांचा जन्म 142 वर्षांपूर्वी याच दिवशी झाला होता. स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी मोठे योगदान दिले. तसेच भारतीय राष्ट्रीय ध्वजाचे डिझाईन त्यांनी केले होते. मच्छलीपट्टणम (जे सध्या आंध्र प्रदेशात आहे) येथे जन्मलेले पिंगली वेंकय्या हे गांधीवादी विचारसरणीचे होते. त्याच प्रमाणे ते भाषातज्ज्ञ, भूगर्भशास्त्रज्ञ आणि लेखक म्हणूनही परिचित होते. 1913 मध्ये त्यांनी जपानी भाषेत भाषण देखील केले होते. यामुळे ते जपान वेंकय्या, पट्टी (कापूस) वेंकय्या, झेंडा वेंकय्या या नावाने देखील ओळखले जाऊ लागले. 19 वर्षीय पिंगली वेंकय्या ब्रिटीश सैन्यात कार्यरत असताना त्यांची अफ्रिकेत महात्मा गांधी यांच्याशी भेट झाली. त्यानंतर सुमारे 50 वर्षांहून अधिक काळ ते महात्मा गांधींसोबत होते. 1916 मध्ये त्यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकात भारतीय राष्ट्रीय ध्वज कसा असू शकेल, या अनुषंगाने 30 डिझाईन्सचा समावेश होता. 1918 आणि 1921 च्या दरम्यान झालेल्या काॅंग्रेसच्या अधिवेशांमध्ये आपला स्वतःचा ध्वज असावा, ही संकल्पना सातत्याने मांडली. वेंकय्या यांनी डिझाईन केलेल्या राष्ट्रध्वजाला विजयवाडा येथे झालेल्या काॅंग्रेसच्या अधिवेशनात महात्मा गांधी यांनी मान्यता दिली.

(वाचा - गलवान खोऱ्यात शेवटच्या श्वासापर्यंत लढले; शहीद कर्नल संतोष यांनां 'महावीर चक्र')

याबाबत महात्मा गांधी यंग इंडियामध्ये लिहीतात की, मच्छलीपट्टणम येथील आंध्र नॅशनल काॅलेजमध्ये कार्यरत असलेल्या पिंगली वेंकय्या यांनी देशांच्या ध्वजांचे वर्णन करणारे एक पुस्तक प्रकाशित केले आहे. तसेच त्यात आपल्या राष्ट्रीय ध्वजासाठी अनेक माॅडेल्सच्या डिझाईन्सचा देखील समावेश केला आहे. इंडियन नॅशनल फ्लॅगच्या मान्यतेसाठी इंडियन नॅशनल काॅंग्रेसच्या अधिवेशात त्यांनी केलेल्या कठोर परिश्रमांचे मी कौतुक करतो. 'राष्ट्रीय ध्वजाच्या शतकमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करा' काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते व्ही हनुमंता राव यांनी आज राज्य सरकारकडे यंदाच्या एप्रिल महिन्यात राष्ट्रीय ध्वजाच्या शतक महोत्सवी वर्धापनदिन निमित्ताने सोहळ्याचे आयोजन करावे, अशी मागणी केली. राष्ट्रीय ध्वजाचे डिझाईन करणारे जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी पिंगली वेंकय्या यांना आदरांजली वाहण्यात रस नाही का, असा सवालही त्यांनी राज्य सरकारकडे केला असल्याचे वायधीस न्यूजच्या वृत्तात म्हटले आहे. राज्य सरकारने यानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन केल्यास देशभक्तीचा संदेश राज्यातील खेडोपाडी पोहोचेल, असेही त्यांनी नमूद केले आहे.

(वाचा - 'आता वेळ आली आहे...'; कन्यादानात मिळालेले पैसे नववधुने राम मंदिरासाठी केले दान)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) हे ओबीसी (OBC) समुदायातील असूनही देशातील ओबीसींशी कोणताही न्याय्य व्यवहार केला जात नाही, अशी टीका करत त्यांनी पंतप्रधान मोंदीवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी ओबीसींसाठीची क्रिमी लेअरची अट रद्द करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली. देशात ओबीसींना 27 टक्के आरक्षण आहे. परंतु, एकूण आरक्षणाच्या दहा टक्केसुध्दा ओबीसींना लागू केले जात नाही, असेही ते म्हणाले. 'सोनिया गांधी यांच्या हस्ते ध्वजारोहण व्हावे' राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी पिंगली वेंकय्या यांना आदरांजली म्हणून 1 एप्रिल रोजी विजयवाडा येथे काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Congress President Sonia Gandhi) यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा व्हावा, अशी मागणी माजी खासदार व्ही. हनुमंता राव यांनी सोनिया गांधी यांच्याकडे केली असल्याचेही म्हटले आहे. पिंगली वेंकय्या यांच्या जयंतीनिमित्ताने वर्षभर कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश राज्य काॅंग्रेसच्या विभागांना द्यावेत, अशी विनंती राव यांनी सोनिया गांधी यांना पत्राद्वारे केली आहे.
Published by:news18 desk
First published:

Tags: Republic Day, Republic day india, Sonia gandhi

पुढील बातम्या