मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'आता वेळ आली आहे...'; कन्यादानात मिळालेले पैसे नववधुने राम मंदिरासाठी केले दान

'आता वेळ आली आहे...'; कन्यादानात मिळालेले पैसे नववधुने राम मंदिरासाठी केले दान

ती म्हणते की, जेव्हा कधी मी राम मंदिर पाहिन, तेव्हा मला माझ्या लग्नाचा दिवस आठवेल.

ती म्हणते की, जेव्हा कधी मी राम मंदिर पाहिन, तेव्हा मला माझ्या लग्नाचा दिवस आठवेल.

ती म्हणते की, जेव्हा कधी मी राम मंदिर पाहिन, तेव्हा मला माझ्या लग्नाचा दिवस आठवेल.

  • Published by:  Meenal Gangurde
सूरत, 25 जानेवारी : अयोध्येत तयार करण्यात येणाऱ्या भव्य राम मंदिरासाठी देशातील प्रत्येक व्यक्ती मदतीसाठी पुढे येत आहे. गरीब म्हणतात की, त्यांना राहायला झोपडी मिळाली नाही तरी रामाचं मंदिर तयार व्हायलाच हवं. तर श्रीमंतांकडूनही मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत दिली जात आहे. यादरम्यान सूरतमधील एका वधुने लग्नात कन्यादानात मिळालेली दीड लाखांची रक्कम राममंदिरासाठी दान केली आहे. तिचं म्हणणं आहे की, जेव्हा कधी मी राम मंदिर पाहिन, तेव्हा मला माझ्या लग्नाचा दिवस आठवेल. मिळालेल्या माहितीनुसार सूरतमधील हिऱ्यांचे व्यापारी रमेश भालानी यांची मुलगी दृष्टी ज्वेलरी डिजायनर आहे. तिचं लग्न लूम्स व्यावसायिक सिद्धार्थसोबत झालं. आपल्या लग्नादरम्यान वडिलांकडून कन्यादानात मिळालेली दीड लाखांची रक्कम तिने अयोध्येतील राम मंदिरासाठी दान केली आहे. हे ही वाचा-गलवान खोऱ्यात शेवटच्या श्वासापर्यंत लढले; शहीद कर्नल संतोष यांनां 'महावीर चक्र' वधु म्हणाली.. दृष्टीने राममंदिराच्या उभारणीसाठी दीड लाख रुपयांचा चेक दिला. यावेळी ती म्हणाली की, गेल्या अनेक वर्षांपासून राम मंदिर निर्माणबाबत बोललं जात होतं. आता वेळ आली आहे , की राम मंदिराची उभारणी केली जावी. हा माझ्या कुटुंबासाठी अभिमानाचा क्षण आहे. माझ्या वडिलांकडून मला यासाठी प्रेरणा मिळाली. पुढे ती म्हणते की, मी कधी स्वप्नातही असा विचार केला नव्हता. मात्र भगवान रामाच्या कृपेमुळे मला ही संधी मिळाली. भविष्यात जेव्हा मी अयोध्येत जाऊन राममंदिराचं दर्शन घेईल, त्यावेळी मला माझ्या लग्नाचा दिवस आठवेल. पाहुण्यांनीही केलं दान सांगितलं जात आहे की, वधुचं ऐकून लग्नात आलेल्या अनेक पाहुण्यांनी राम मंदिरासाठी दान दिलं. सुरतमध्ये दररोज मोठ्या संख्येने लोक राम मंदिर उभारणीसाठी दान देत आहे. येथे राहणाऱ्या धनजी राखोलिया आणि राकेश दुधात यांनी काही दिवसांपूर्वी 11-11 लाख रुपयांचं दान दिलं होतं. एकट्या सूरतमध्ये अनेक जणांनी कोट्यवधी रुपये राम मंदिराच्या उभारणीसाठी दान दिलं आहे.
First published:

Tags: Ayodhya ram mandir, Marriage, Ram Mandir

पुढील बातम्या