रांची, 3 जून : कोरोना लॉकडाऊनमुळे जवळपास प्रत्येकाच्या आयुष्याची नवी सुरुवात झाली, जगण्याला एक नवी दिशा मिळाली. अनेकांचं आयुष्य तर पुरतं पालटलं. आज आपण अशाच एका तरुणीची कथा पाहणार आहोत, जिने चक्क सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग क्षेत्र सोडून मोमोजचं दुकान टाकलं. आज तिची कमाईही प्रचंड आहे आणि तिचं दुकानही तुफान चर्चेत आहे. ही कथा आहे, झारखंडच्या पूजाची. ती बंगळुरूमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून एक उत्तम नोकरी करत होती. तिचं सगळं छान सुरू होतं. आता आपण स्थिरस्थावर झालोय असं तिला वाटायचं, परंतु लॉकडाऊन आलं आणि सगळंच बदललं. पूजाची नोकरी गेली. मग तिने आपला घरची म्हणजेच रांचीची वाट धरली. लॉकडाऊनमध्ये लगेच दुसरी नोकरी मिळणंही शक्य नव्हतं, शिवाय तिचं लग्नाचं वय झालं होतं. मग तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर करिअरचा विचार केल्यावर तिला नोकरी करण्याबाबत जरा साशंकता वाटत होती. पुन्हा लॉकडाऊनसारखी परिस्थिती आली तर पुन्हा घरी बसावं लागेल, असं तिला वाटायचं. म्हणून तिने एखादा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. तिला खाण्याची फार आवड असल्याने एखादा पदार्थच विकायचा, असं तिने ठरवलं. फेरीवाल्यांनो, 10 ते 50 हजारांचं बिनव्याजी कर्ज हवंय? मग ‘या’ योजनेसाठी करा अर्ज मग जरा संशोधन केल्यावर तिच्या लक्षात आलं की, सध्या स्ट्रीट फूडमध्ये मोमोजचा बोलबाला आहे. एखाद्या मोमोजच्या दुकानासमोर गर्दी नाही, असं क्वचितचं पाहायला मिळतं. हा सगळा विचार करून तिने अखेर मोमोजचं दुकान सुरू करण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊनमुळे सुरू केलेल्या या दुकानाचं नावही तिने ‘लॉकडाऊन हंगर’ असं ठेवलं. आज तिच्या या दुकानात वेगवेगळ्या प्रकारचे मोमोज मिळतात. क्रिस्पी मोमोजची तर अख्ख्या रांचीमध्ये चर्चा असते. शिवाय दिवसाला शेकडो ग्राहक येत असल्याने कमाईही बक्कळ आहे. अशाप्रकारे पूजाच्या आयुष्याला लॉकडाऊनमुळे एक नवी दिशा मिळाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.