नवी दिल्ली, 30 एप्रिल : भारतात जर कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) लॉकडाऊन काळ वाढवला तर कोरोनाने नाही तर लोक उपासमारीने मरतील, असं वक्तव्य Infosys चे सहसंस्थापक नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांनी केलं आहे. एका वेबिनारदरम्यान त्यांनी हे विधान केलं आहे.
मूर्ती पुढे असंही म्हणाले की, देशाला आता कोरोना व्हायरसला सामान्य पद्धतीने स्वीकारत सक्षम लोकांनी कामावर परतायला हवे. तर दुसरीकडे ज्यांना संसर्गाची भीती असेल त्यानी काळजी घ्यायला हवी.
लॉकडाऊन वाढण्याची भीती
बुधवारी एका वेबिनारमध्ये इन्फोसिसचे सह-संस्थापक आणि पूर्व चेअरमन नारायण मूर्ती म्हणाले, आपल्यासाठी हे समजून घेणं आवश्यक आहे की, भारताला फार काळासाठी लॉकडाऊन जारी ठेवता येऊ शकत नाही. कारण की एक वेळ अशी येईल की जेव्हा उपासमारीने मरणाऱ्यांची संख्या कोरोनाने मरणाऱ्यांच्या संख्येपेक्षा जास्त असेल. ते पुढे म्हणाले की कोविड – 19 चे एकूण पॉझिटिव्ह प्रकरणात मृत्यूदर 0.25 ते 0.50 टक्क्यांपर्यंत आहे.
देशभरात वाढत्या कोरोनाच्या रुग्णांबरोबरच अर्थव्यवस्थेचे होणारे नुकसान याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. याशिवाय लॉकडाऊनमध्ये कामं बंद असल्याने अनेक मजूर बेरोजगार झाले आहे. त्यातही रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांचे हाल होत आहेत. याबाबत विविध तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
संबंधित -घरी जाण्यासाठी परप्रांतीयांना पाळावे लागतील 'हे' नियम, सरकारने केले जाहीर
12 तासांत 51 कोरोना रुग्ण, तीर्थयात्रा करुन गेलेल्या भाविकांमुळे वाढली संख्या