12 तासांत 51 कोरोना पॉझिटिव्ह, नांदेडहून तीर्थयात्रा करुन गेलेल्या भाविकांमुळे बाधितांच्या संख्येत मोठी वाढ

12 तासांत 51 कोरोना पॉझिटिव्ह, नांदेडहून तीर्थयात्रा करुन गेलेल्या भाविकांमुळे बाधितांच्या संख्येत मोठी वाढ

देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने सरकारने विविध भागांमध्ये हॉटस्पॉट केला आहे

  • Share this:

चंदीगड, 30 एप्रिल :  देशभरात कोरोनाच्या (Coronavirus) रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या नागरिकांची परिस्थिती पाहता काही ठिकाणी कामे सुरू करण्यात आली आहे. अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी हे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील नांदेड येथील तख्त श्री हजूर साहिब यांचं दर्शन घेणारे भाविक आणि कोटामध्ये अडकलेले विद्यार्थी पंजाबमध्ये परतले आहे. यामुळे मात्र कोरोनाच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी भाविक नांदेडला दर्शनासाठी गेले होते. लॉकडाऊन लागू केल्यापासून ते तेथे अडकून पडले होते.

गेल्या 12 तासांत 51 भाविकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण 87 भाविकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत तब्बल 3613 भाविक नांदेडहून तीर्थयात्रे करुन पंजाबमध्ये परतले आहेत.

एकट्या अमृतसरमध्ये 23 भाविक कोरोना पॉझिटिव्ह आले असून मोहामीमध्ये एका वेळेस 10 भाविकांच्या संसर्गाची पुष्टी करण्यात आली आहे. तनरतारन, गुरादसपुर, मुक्तसर, मोगा आणि जलंधर येथे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. हे सर्वजण काही काळापूर्वी नांदेड येथील तख्त श्री हजूर साहिब यांच्या दर्शनासाठी गेले होते. आता पंजाबमधील कोरोना रुग्णांची संख्या वाढून 431पर्यंत पोहोचली आहे.

संबंधित -अखेर लेक रिद्धिमा कपूरला मिळाली खास परवानगी, प्रायव्हेट जेटने मुंबईला पोहोचणार

First published: April 30, 2020, 5:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading