जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / घरी जाण्यासाठीची नियमावली सरकारने केली जाहीर; परप्रांतीयांना बंधनकारक असतील हे नियम

घरी जाण्यासाठीची नियमावली सरकारने केली जाहीर; परप्रांतीयांना बंधनकारक असतील हे नियम

घरी जाण्यासाठीची नियमावली सरकारने केली जाहीर; परप्रांतीयांना बंधनकारक असतील हे नियम

परप्रांतीयांना घरी जाण्यासाठी काही नियमांचा अवलंब करावा लागणार आहे. या प्रवासात सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेतली जाणार आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

गोविंद वाकडे/ पुणे, 30 एप्रिल : लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, यात्रेकरू तसेच इतर नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कार्यपद्धती निश्चित केली आहे. लॉकडाऊन लागू केल्यापासून हजारो मजूर राज्यात अडकले आहेत. त्यांना त्यांच्या राज्यांत पोहोचविण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. मात्र यासाठी राज्य सरकारने काही नियमावली जाहीर केली आहे. मजूर व विद्यार्थ्यांना दुसऱ्या राज्यात त्यांच्या घरी पाठवताना या नियमांचा अवलंब करणे अनिवार्य आहे. सर्व जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी असतील तसेच मंत्रालयातील नियंत्रण कक्षाद्वारे यावर देखरेख ठेवली जाईल. याबाबतीत अतिशय काळजीपूर्व व जबाबदारीने सर्व यंत्रणांनी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.आणि राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी या बाबतचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहेत. नियमावली -सर्व परप्रांतीयांना रस्ते मार्गाने घरी जाता येणार आहे. रेल्वे सेवा बंदच राहतील -मजूर व विद्यार्थ्यांना तत्सम व्यवस्थापकांकडून पास दिले जातील. त्याच्या आधारावरच प्रवास करता येणार आहे. -राज्यात येणाऱ्या नागरिकांची प्रथम तपासणी करण्यात येईल. त्यानंतर त्यांना पुढील 14 ते 16 दिवस क्वारंटाइन करण्यात येईल. -परप्रांतीयांचीही चाचणी केली जाईल. त्यात जर ते पॉझिटिव्ह आढळले तर त्यांना घरी जात येणार नाही. -जिल्ह्यांचे नोडल अधिकारी त्यांच्या जिल्ह्यातील अडकलेल्या व्यक्तींची यादी तयार करून संबंधित इतर जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवतील. परराज्यातील लोकांच्या ये-जासाठी दोन्ही राज्ये एकमेकांशी बोलून त्यांची रस्तेमार्गे कशी वाहतूक करायची ते ठरवतील. -जिल्हाधिकारी किंवा संचालक, राज्य आपत्ती व्यवस्थापन यांचे पत्र असल्याशिवाय लोकांच्या कोणत्याही गटाला स्थलांतर करण्याची परवानगी दिली जाणार नाही. ज्या व्यक्तीना कोविड किंवा इंफ्लूएन्झा सारखी लक्षणे नाहीत त्यानांच केवळ प्रवासाची परवानगी दिली जाईल. लक्षणे असल्यास निश्चित केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे वैद्यकीय उपचार करण्यात येतील. ज्या राज्यात ती व्यक्ती जात आहे तेथील राज्याने ठरवलेल्या नियमांप्रमाणे वागणे व उपचार घेणे त्या व्यक्तीवर बंधनकारक असेल. ज्यांना स्वत:च्या वाहनाने जायचे आहे त्यांच्याकडे देखील अशाच पद्धतीने राज्यांची संमती पत्रे असणे आवश्यक आहे. प्रवाशाना घेऊन जाणाऱ्या वाहनांकडे राज्याचा ट्रान्झीट पास असणे व त्यावर सर्व प्रवाशांची नावे व इतर माहिती असणे गरजेचे आहे. यामध्ये वाहनाचा निश्चित मार्ग, कालावधी असणेही बंधनकारक आहे.

News18

महाराष्ट्रात इतर राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस क्वारंटाईन कालावधीत राहावे लागेल. आलेल्या सर्व प्रवाशांची प्रथम वैद्यकीय तपासणी होईल. त्यानंतर सबंधित व्यक्तीस घरीच क्वारंटाईन किंवा संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येईल तसेच त्यांना केंद्र शासनाचे आरोग्यसेतू मोबाईल एप डाऊनलोड करण्यास सांगण्यात येईल जेणे करून त्यांना कायम संपर्कात ठेवता येईल. दरम्यान ह्या बाबत पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम ह्यांना विचारले असता त्यांनी अशा आदेश प्राप्त झाले असून त्यानुसार जिल्ह्यात असलेल्या सुमारे 50 हजार मजुरांपैकी किती मजूर परत जाऊ इच्छितात किंवा न जाऊ इच्छिणाऱ्या मजुरांसाठी लेबर कॅम्प उभारणीची तयारी केली जात असल्याची माहिती दिलीय मात्र स्थलांतरणाबाबत जिल्हा प्रशासकीय स्तरावर देण्यात आलेल्या सर्व सुचना बाबत खात्री झाल्याशिवाय कुणीही जाण्याची घाई करू नाही, असं आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम ह्यांनी केलं आहे. संबंधित - 12 तासांत 51 कोरोना रुग्ण, तीर्थयात्रा करुन गेलेल्या भाविकांमुळे वाढली संख्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात