नवी दिल्ली, 27 एप्रिल : लग्न म्हटलं की, मजा मस्ती ही आलीच. लग्नसमारंभातील अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर गराळा घालतात. आत्तापर्यंत लग्नातील मजेशीर, विचित्र, धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. ज्यांनी नेटकऱ्यांचं खूप मनोरंजन केलं, त्यांना पोट धरुन हसवलं. अशातच लग्नातील आणखी एक मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे जो पाहून तुम्हीही हसून हसून लोटपोट व्हाल. कधी कधी अनपेक्षित घटना घडतात ज्यावर कोणीही नियंत्रण ठेवू शकत नाही. असाच काहीसा प्रकार सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पहायला मिळत आहे. लग्नातील हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लग्न समारंभात हार घालण्याचा कार्यक्रम सुरु आहे. सुरुवातीला नवरी नवरदेवाला हार घालते. त्यानंतर नवरदेव नवरीला हार घालतो मात्र तेव्हा त्याच्यासोबत अनपेक्षित घडतं. त्याचा पायजमा हार घालताना सटकतो. हे पाहून समारंभात एकच हशा पिकतो. सुरुवातीला नवरदेवाला समजत नाही मात्र सर्वजण त्याच्या पायजमाकडे पाहून हसू लागतात तेव्हा तो खाली बघतो आणि त्याला समजतं की आपला पायजना निसटला आहे. हे पाहून त्याला आणि नवरीला दोघांनाही हसू अनावर होतं. मग नवरदेव आतमध्ये चालला जातो.
व्हायरल होत असलेला हा 45 मिनिटांचा व्हिडीओ @HasnaZarooriHai या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ भरपूर व्हायरल होत असून व्हिडीओवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. काही वेळातच हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसला.