जमीन घोटाळ्यात मिसेस वाड्रांचंही नाव, स्मृती इराणींचा प्रियांका गांधींवर हल्लाबोल

भाजपकडून प्रियांका गांधींवर पहिल्यांदाच थेट हल्ला

News18 Lokmat | Updated On: Mar 13, 2019 02:55 PM IST

जमीन घोटाळ्यात मिसेस वाड्रांचंही नाव, स्मृती इराणींचा प्रियांका गांधींवर हल्लाबोल

नवी दिल्ली, 13 मार्च : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस पक्षावर जमीन घोटाळ्यावरून गंभीर आरोप केले आहेत. बुधवारी (13 मार्च) पत्रकार परिषद घेत इराणी यांनी काँग्रेसवर प्रहल्लाबोल केला. जमीन घोटाळ्यात राहुल गांधी, रॉबर्ट वाड्रा आणि श्रीमती वाड्रा यांच्याही नावाचा समावेश आहे, असा गंभीर स्मृती इराणी यांनी केला आहे. भाजपकडून प्रियांका गांधीवर पहिल्यांदाच थेट हल्ला करण्यात आला आहे.


दुसरीकडे, राहुल गांधींवर निशाणा साधत स्मृती इराणींनी म्हटलं की, भाऊजींसोबत (रॉबर्ट वाड्रा)मेहुण्याचाही भ्रष्टाचारात समावेश आहे. राहुल गांधी हाच भ्रष्टाचाराचा चेहरा आहे, रॉबर्ट वाड्रा फक्त भ्रष्टाचाराचा मुखवटा आहे. गांधी परिवाराने भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले आहे.


यावेळेस इराणींनी काँग्रेसवर फॅमिली पॅकेज भ्रष्टाचार करण्याचाही धक्कादायक आरोप केला. दरम्यान, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांची कालच पहिली सभा  गुजरातमध्ये झाली. सभेदरम्यान, प्रियांका गांधींनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर चौफेर टीका केली होती. त्यानंतर आज लगेचच भाजपनं पत्रकार परिषद घेत काँग्रेसला टार्गेट करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत आहे.
रॉबर्ट वाड्रांवरील आरोप

हरियाणातल्या गुडगावमधील जमीन घोटाळा प्रकरणी रॉबर्ट वाड्रा आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. FIR मध्ये DLF ही कंपनी आणि ओंकारेश्वर प्रॉपर्टीज यांचं नाव सामील आहे. सुरेंद्र शर्मा नावाच्या व्यक्तीनं याप्रकरणी एक FIR दाखल केली होती. 2007 मध्ये स्काईलाईट हॉस्पिटॅलिटी कंपनीनं शिकोहपूर गावात ओंकारेश्वर प्रॉपर्टीजच्या माध्यमातून 3 एकर जमीन कवडीमोल दरानं विकत घेतली होती, अशी माहिती शर्मा यांनी दिली आहे. रॉबर्ट वाड्रा या कंपनीचे संचालक आहेत. हरियाणाचे तत्कालीन मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी नियम धाब्यावर बसवत या जमिनीचा व्यापार केला होता, असाही आरोप करण्यात आला आहे.


वाचा : आश्वासने देणाऱ्यांना विचारा 15 लाख कुठे गेले? मोदींच्या बालेकिल्ल्यातून प्रियांका गांधींचा हल्लाबोल

दरम्यान, गुजरातमधील जाहीर सभेदरम्यान त्यांनी पंतप्रधान मोदींना टार्गेट केले.'आगामी निवडणुकीत भावनिक मुद्यांपेक्षा तुमच्यासाठी जे मुद्दे महत्त्वाचे आहेत ते समजून घ्या', असे सांगत काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी नागरिकांना योग्य व्यक्तीला मतदान करण्याचे आवाहन केले. आगामी निवडणुकीत तुम्हाला गंभीरपणे विचार करावा लागेल की तुम्हाला कशाची निवड करायची आहे. तुम्ही तुमचे भविष्य निश्चित करणार आहेत. त्यामुळे निवडणुकीत फालतू मुद्यांना जागा देऊ नका, असेही त्यांनी म्हटलं.तुमची प्रगती कशी होईल, युवकांना रोजगार कसा मिळेल, महिलांची सुरक्षित वाटेल, त्यांची प्रगती होईल या मुद्दयांना महत्त्व द्या आणि विचार करुन मतदान करण्यास त्यांनी सांगितले.


जे लोक तुम्हाला मोठ मोठी आश्वासने देतात. त्यांना विचारा की दोन कोटी रोजगार देण्याच्या आश्वासनाचे काय झाले, असे सांगत प्रियांका गांधी यांनी मोदींचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

प्रियांका गांधींच्या पहिल्या भाषणाचे हे 10 मुद्दे

1 या लोकसभा निवडणुका देशासाठी महत्त्वाच्या आहेत.

2 नागरिकांची सतर्कता हेच या निवडणुकीतलं मोठं हत्यार आहे.

3 मतदान हा तुमचा अधिकार आहे. तो अधिकार नीट विचार करून बजावा.

4 आज देशात जे घडतं आहे त्याबद्दल दु:ख वाटतं.

5 भारतात जागोजागी द्वेष पसरवला जातोय, हे वाईट आहे.

6 भारताची भूमी ही महात्मा गांधींची भूमी आहे, या देशाची शिकवण काय आहे ते तुम्ही जाणून घ्या.

7 येत्या निवडणुकीत फालतू मुद्द्यांना जागा देऊ नका

8 देशातल्या लोकशाहीच्या संस्था नष्ट केल्या जातायत हे गंभीर आहे.

9 नागरिकांच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होणार होते ते कुठे गेले ?

10 या सरकारने वचन दिल्याप्रमाणे 2 कोटी रोजगार मिळाले का ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 13, 2019 02:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close