गांधीनगर, 11 मार्च: आगामी निवडणुकीत भावनिक मुद्दयांपेक्षा तुमच्यासाठी जे मुद्दे महत्त्वाचे आहेत ते समजून घ्या, असे आवाहन करत काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी नागरिकांना योग्य व्यक्तीला मतदान करण्याचे आव्हान केले.आगामी निवडणुकीत तुम्हाला गंभीरपणे विचार करावा लागेल की तुम्हाला कशाची निवड करायची आहे. तुम्ही तुमचे भविष्य निश्चित करणार आहेत. त्यामुळे निवडणुकीत फालतू मुद्द्याना जागा देऊ नका, असे आव्हान त्यांनी केले. तुमची प्रगती कशी होईल, युवकांना रोजगार कसा मिळेल, महिलांची सुरक्षित वाटेल, त्यांची प्रगती होईल या मुद्दयांना महत्त्व द्या आणि विचार करुन मतदान करण्यास त्यांनी सांगितले. जे लोक तुम्हाला मोठ मोठी आश्वासने देतात. त्यांना विचारा की दोन कोटी रोजगार देण्याच्या आश्वासनाचे काय झाले, असे सांगत प्रियांका गांधी यांनी मोदींचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. काय म्हणाल्या प्रियांका गांधी -प्रियांका गांधी यांचे गुजरातमधून पहिले भाषण -साबरमती आश्रमात सदभावनेची शिकवण दिली -आज देशात जे घडत आहे त्यामुळे दु:ख होते -तुम्ही सर्व जण जागरुक व्हा -प्रियांका गांधी यांनी मतदान करण्याचे आव्हान केले -येत्या निवडणुकीत फालतू मुद्द्याना जागा देऊ नका -या देशाची सुरक्षा केवळ तुम्हीच करु शकता- प्रियांका गांधी -सत्यासोबत चालणे हा भारताचा इतिहास आहे -दोन कोटी लोकांना रोजगार देण्याच्या आश्वासनाचे काय झाले? -मोठ मोठी आश्वासने देणाऱ्यांना विचारा 15 लाख कुठे गेले VIDEO : गुजरातमधील प्रियांका गांधींची पहिली सभा, UNCUT भाषण
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.