मराठी बातम्या /बातम्या /देश /

वाहतूक कोंडीवर रामबाण उपाय; आता येणार हवेत उडणारी टॅक्सी, जाणून घ्या डिटेल्स

वाहतूक कोंडीवर रामबाण उपाय; आता येणार हवेत उडणारी टॅक्सी, जाणून घ्या डिटेल्स

अँरो टॅक्सी

अँरो टॅक्सी

आतापर्यंत विमान, हेलिकॉप्टर किंवा रोप वे या माध्यमातून हवेत उडण्यासाठी येत होतं. मात्र त्यांचा उपयोग लांब अंतरावर जाण्यासाठी केला जातो. आता एरोटॅक्सीमुळे हवेत उडून थोड्या अंतरावर जाता येऊ शकेल.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 15 नोव्हेंबर :    तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आरोग्य, वाहतूक, अन्नप्रक्रिया अशा जवळपास सर्व क्षेत्रांमध्ये आधुनिकीकरण झालं. भविष्यात निर्माण होणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आवश्यक त्या सुविधा तयार करण्यात आल्या. ट्रॅफीक ही भविष्यातली मोठी समस्या आहे. रस्त्यांवर गाड्यांची संख्या वाढल्यानं वाहतुकीची समस्या सतत भेडसावते. त्यावर उपाय म्हणून भविष्यात हवेत उडणारी टॅक्सी नागरिकांना दिसू शकते. स्कायस्पोर्ट्स या कंपनीनं अशा प्रकारच्या एरोटॅक्सी तयार करण्याचं काम हातात घेतलंय. आजीच्या गोष्टींमधून जादूची गाडी, हवेत उडणारी गाडी असं ऐकायला मिळत होतं. कालांतरानं अ‍ॅनिमेशन आणि व्हिएफक्समुळे चित्रपटांमध्ये अशा गोष्टी दिसू लागल्या. आता प्रत्यक्षात हवेत उडणारी टॅक्सी दिसणार आहे. आतापर्यंत विमान, हेलिकॉप्टर किंवा रोप वे या माध्यमातून हवेत उडण्यासाठी येत होतं. मात्र त्यांचा उपयोग लांब अंतरावर जाण्यासाठी केला जातो. आता एरोटॅक्सीमुळे हवेत उडून थोड्या अंतरावर जाता येऊ शकेल.

या एरोटॅक्सी स्कायस्पोर्ट्स कंपनीद्वारे तयार केल्या जाणार आहेत. कंपनी 2030 मध्ये या एरोटॅक्सी तयार करणार होती. मात्र आता 2024मध्येच ही टॅक्सी लाँच होणार असल्याचं कंपनीनं जाहीर केलं आहे. या टॅक्सी तयार करण्यासाठी 10 वर्षं लागतील असं टॅक्सी तयार करणाऱ्या तज्ज्ञांनी म्हटलं होतं. मात्र आता पुढील 2 वर्षांतच नागरिकांना या टॅक्सीत बसता येईल.

हेही वाचा - YouTubeवरुन नितीन गडकरी कमावतात लाखो रुपये; भाषणांचे VIDEO होतात तूफान हिट

या एरोटॅक्सी म्हणजे विजेवर चालणारं लहान विमानच असेल. मात्र त्यांना उडणाऱ्यासाठी विमानाप्रमाणे धावपट्टीची आवश्यकता नसेल. ही टॅक्सी आहे त्या स्थितीत आकाशात उंच जाईल व त्याच पद्धतीनं खाली येईल. या टॅक्सीत एका वेळी 4 प्रवासी बसू शकतील. पूर्व लंडनमधील Elstree पासून Canary Wharf या हेलीपॅडपर्यंत या टॅक्सीला पहिल्यांदा उडवलं जाईल. अब्जावधींची संपत्ती असणाऱ्या Ryan कटुंबाकडून या टॅक्सी तयार करण्यासाठी निधी पुरवला जात आहे. त्यांच्या मालकीची Ryanair ही कंपनी व्हर्टीस्पोर्ट्सबाबत सिंगापूर, पॅरिस आणि अमेरिकेत काम करते आहे. ब्रिटनच्या राष्ट्रीय हवाई वाहतूक सेवेसोबत करार केल्यानंतर त्यांनी हिथ्रो आणि सिटी विमानतळांचा वापरही केलेला आहे.

'डेली स्टार'च्या रिपोर्टनुसार, लंडनमधील प्रचंड ट्रॅफिकवर एक उपाय असला, तरी तो सध्या अतिशय खर्चिक आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत व ज्यांना ट्रॅफिकमध्ये अडकायचं नाहीये, त्यांच्यासाठी ही टॅक्सी नक्कीच उत्तम असेल. स्काय स्पोर्ट्सचे संस्थापक डंकन वॉकर यांच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारची टॅक्सी ही जगातली पहिलीच असेल. स्काय स्पोर्ट्स ही कंपनी 2018 मध्ये स्थापन झाली. त्यानंतर त्यांनी खूपच कमी कालावधीत एरोटॅक्सी विकसित केली आहे. त्यामुळे लवकरच हॉलिवूडपटांप्रमाणे लंडनच्या आकाशातून टॅक्सी उडताना दिसल्या तर आश्चर्य वाटायला नको, कारण स्काय स्पोर्ट्सने ही कल्पना सत्यात आणण्याची तयारी पूर्ण केली आहे.

First published:

Tags: Taxi, Tech news, Technology