Home /News /national /

आज भारत कोरोना लसीकरणात गाठणार 100 कोटींचा टप्पा, सेलिब्रेशनसाठी देशभरात जय्यत तयारी

आज भारत कोरोना लसीकरणात गाठणार 100 कोटींचा टप्पा, सेलिब्रेशनसाठी देशभरात जय्यत तयारी

गुरुवारी देशातील कोरोना लसीकरणाचा आकडा 100 कोटींच्या पुढे जाईल. 100 कोटी डोस पूर्ण झाल्यावर सरकारनं सेलिब्रेशनची (preparations for the celebration) तयारीही सुरु केली आहे.

  नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर: कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी देशात सुरु करण्यात आलेल्या (campaign of vaccination) लसीकरणाच्या मोहिमेत देश 100 कोटी (100 crore doses)डोसचा टप्पा पार करणार आहे. गुरुवारी देशातील कोरोना लसीकरणाचा आकडा 100 कोटींच्या पुढे जाईल. 100 कोटी डोस पूर्ण झाल्यावर सरकारनं सेलिब्रेशनची (preparations for the celebration) तयारीही सुरु केली आहे. राम मनोहर लोहिया, दिल्ली येथे एक मोठा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) देखील उपस्थित राहतील. दरम्यान, आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी लोकांना लस घेण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की, ज्या लोकांचं लसीकरण अजूनही बाकी आहे, त्यांनी त्वरित लस घ्यावी आणि देशाच्या या सुवर्ण लसीकरण प्रवासात योगदान द्यावं. हेही वाचा- Coronavirus : दिलासादायक बातमी; 8 महिन्यांनंतर पुण्यात एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू नाही
   100 कोटी लसीकरण पूर्ण झाल्यावर देशभरात सेलिब्रेशनची तयारी करण्यात आली आहे. गुरुवारी, पीएम मोदी सकाळी साडेदहा वाजता RML हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या विशेष कार्यक्रमाला उपस्थित असतील. येथे ते आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांशीही बातचीत करतील. याशिवाय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया कैलास खेर यांनी गायलेले गाणे आणि लाल किल्ल्यावरून ऑडिओ व्हिज्युअल फिल्म लाँच करणार आहेत.
  यासह, स्पाइसजेट लसीकरणाचा 100 कोटींचा आकडा पार केल्यानंतर दिल्ली विमानतळावर एक विशेष प्रकारचे आउटर कवर जारी करणार आहे. केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि स्पाइसजेटचे सीएमडी अजय सिंहही यावेळी उपस्थित असतील. हेही वाचा-  पिंपरी चिंचवडमधील 'त्या' कंपनीचा 500 कोटींचा घोटाळा उघड करा, राऊतांनी थेट सोमय्यांना लिहिले पत्र
   याआधी, मांडवीया यांनी असंही सांगितलं होतं की, देशात 100 कोटी लसीकरणाचा आकडा पूर्ण होताच विमान, जहाजे, मेट्रो आणि रेल्वे स्थानकांवरून लाऊडस्पीकरद्वारे याची घोषणा केली जाईल. या सर्वांव्यतिरिक्त, केंद्र सरकारच्या रुग्णालयांमध्येही मोठ्या सेलिब्रेशनची तयारी केली जात आहे.
  लाल किल्ल्यावर जंगी सोहळा देशात कोरोना (World’s biggest flat will be furled on Red Fort on completion of 100 cr vaccination) लसीचे 100 कोटी डोस पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं लाल किल्ल्यावर जंगी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. 100 कोटी लसींचा ऐतिहासिक टप्पा पार केल्याच्या आनंदाप्रित्यर्थ दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर जगातील सर्वात (World’s biggest flag) उंच झेंडा फडकावला जाणार आहे. गुरुवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमाराला या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. असा आहे झेंडा हा झेंडा 225 फूट उंच आहे. याची रुंदी आहे तब्बल 150 फूट. या भव्यदिव्य झेंड्याचं वजन आहे 1400 किलो. भारतातील स्वदेशी खादीपासून हाताने विणकाम करून हा झेंडा तयार करण्यात आला आहे. या झेंड्याचं क्षेत्रफळ 37 हजार 500 स्क्वेअर फूट एवढं आहे. या झेंड्यासाठी 4600 मीटर सुती कापडाचा वापर करण्यात आला आहे. एकूण 70 जणांनी मिळून हा झेंडा तयार केला असून या कामासाठी 49 दिवस अहोरात्र काम सुरू होतं. हेही वाचा-  मोठी बातमी, काँग्रेसमध्ये नाराज झालेले सचिन सावंत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला!
   लसीकरणाला वेग
  भारतात 16 जानेवारीपासून लसीकरणाला औपचारिकरित्या सुरुवात झाली होती. त्यानंतरच्या काही महिन्यात लसीच्या पुरवठ्याअभावी वेगाला खिळ बसली होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा एकदा देशातील लसीकरणाने वेग घेतला असून 99 कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला आहे. ज्या क्षणी 100 कोटी लसीकरण पूर्ण होईल, त्या क्षणी देशभरात याची घोषणा केली जाणार आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published:

  Tags: Corona vaccination, Corona vaccine

  पुढील बातम्या