नवी दिल्ली, 18 जुलै: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा (Narendra Modi Cabinet) विस्तार झाल्यानंतर त्यात 43 नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदाची (43 new ministers) शपथ देण्यात आली. मंत्रिमंडळाच्या नव्या विस्तारात राज्यमंत्री झालेले तमिळनाडू (**Tamil Nadu)**भाजपचे अध्यक्ष एल. मुरुगन (L. Murugan) यांचे आईवडिल मात्र त्यांच्या मूळ कामातच मशगूल आहेत. मुलगा मंत्री झाला तरी त्यांनी आपल्या गावात राहून आपलं शेतमजुरीचं काम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुलगा मंत्री झाल्याचा आनंद असला, तरी जे काम आपण आयुष्यभर करत आलो, तेच काम करत राहणं, त्यांनी पसंत केलं आहे. तमिळनाडूतील मूळ गावी करतात मजुरी तमिळनाडूतील कोन्नूर हे मुरुगन यांचं मूळ गाव. आईवडिलांनी मित्रांकडून उधारी घेऊन एल. मुरुगन यांना शिकवलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि स्वतःच्या कर्तृत्वानं ते मंत्रिपदापर्यंत पोहोचले. मुलानं हा सगळा प्रवास स्वतःच्या जीवावर आणि मेहनतीवर केला असून त्यात आपलं काहीही श्रेय नसल्याचं त्यांच्या आईवडिलांनी प्रांजळपणे माध्यमांना सांगितलं आहे. आपला गावच बरा एल. मुरुगन जेव्हा भाजपचे अध्यक्ष झाले, तेव्हा चेन्नईतील घरी येऊन राहण्याची विनंती त्यांनी आईवडिलांना केली होती. काही दिवस ते तिथं राहिलेदेखील. मात्र त्यांचं मन काही तिथं रमेना. एल. मुरुगन यांची व्यस्तता आणि आईवडिलांना सतावणारा रिकामा वेळ असं चित्र निर्माण व्हायचं. त्यामुळे त्यांनी पुन्हा आपल्या मूळ कोन्नूर गावी परतायचा निर्णय घेतला. ते दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करतात आणि मिळेल ते काम करून आपली गुजराण करत असतात. माध्यमांचे प्रतिनिधी जेव्हा त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी शेतावर गेले, तेव्हा शेतमालकाची परवानगी घेऊन मग त्यांना मुरुगन यांच्या आईवडिलांची प्रतिक्रिया घेता आली. हे वाचा - राज्यात शिवसेना-भाजप-एनसीपी एकत्र येण्याची चर्चा, त्यावर संजय राऊत म्हणतात… अनोखा संदेश मोदी सरकारनं सोशल इंजिनिअरिंग करत मागास वर्गातील खासदारांचं प्रतिनिधित्व वाढवलं आहे.या नव्या मंत्र्यांच्या प्रवासाची जशी चर्चा होत आहे, तितकंच कौतुक त्यांच्या आईवडिलांच्या साधेपणाचंही होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.