अयोध्या, 2 फेब्रुवारी : साऱ्या देशाचं लक्ष सध्या अयोध्येतल्या श्रीराम मंदिराकडे लागून राहिलं आहे. अयोध्येत श्रीरामांचं भव्य मंदिर तयार होतंय. हे मंदिर कसं असेल, भगवान श्रीरामांची मूर्ती कशी असेल, याबाबत लोकांमध्ये उत्सुकता आहे. नुकतीच नेपाळवरून जवळपास 127 क्विंटल वजनाची शाळिग्राम शिळा रस्त्याने अयोध्येत आणण्यात आलीय. तिथे वैदिक ब्राह्मणांच्या उपस्थितीत त्या शिळेची विधिवत पूजा करण्यात आली.
या शिळेपासून श्रीरामांची मूर्ती तयार होणार आहे की नाही, याबाबत अजून निश्चित माहिती मिळालेली नाही. श्रीराम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टकडून यावर अंतिम निर्णय जाहीर होईल; मात्र नेपाळवरून ही शिळा का आणण्यात आली याबाबत लोकांमध्ये खूप चर्चा आहे. शाळिग्राम दगड आपल्याकडे पूजनीय मानला जातो. देव्हाऱ्यात त्याची पूजा केली जाते. आता अयोध्येतही शाळिग्राम शिळा आणण्यात आलीय.
काय आहे महत्त्व?
रामलल्ला मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांच्या म्हणण्यानुसार, शाळिग्रामाची शिळा सनातन धर्मात महत्त्वाची मानली जाते. जवळपास प्रत्येक मंदिर व मठात शाळिग्रामाची शिळा असते. शाळिग्रामात भगवान विष्णूंचा वास असतो असं म्हणतात. नेपाळमधल्या पवित्र अशा गंडकी नदीमध्ये हे शाळिग्राम सापडतात. ज्या ठिकाणी हे शाळिग्राम असतात, तिथे देवी लक्ष्मीचाही सदैव वास असतो, असं मानलं जातं.
Ayodhya Ram Temple : श्रीरामाच्या मूर्तीसाठी वापरण्यात येणाऱ्या शाळिग्रामचे महत्त्व माहिती आहे का?
देशातल्या सगळ्या मंदिरांमध्ये, मठांमध्ये शाळिग्राम दगडापासून मूर्ती घडवल्या जातात. असं म्हणतात, की शाळिग्रामापासून बनवलेल्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली जात नाही. कारण शाळिग्रामात आधीपासूनच भगवान विष्णूचा वास असतो. तसंच या दगडाचा तुळशीमातेशीही संबंध आहे. त्यामुळेच शाळिग्रामाची पूजा जवळपास सगळ्या मंदिरांमध्ये केली जाते.
देवाची आरती करताना दिवा तेलाचा लावावा की तूपाचा ?
शाळिग्रामाला हिंदू समाजामध्ये खूप महत्त्व आहे. काळा व बरेचदा गुळगुळीत दिसणारा शाळिग्राम देव्हाऱ्यात ठेवून मनोभावे त्याची पूजा केली जाते. नेपाळच्या पशुपतिनाथ मंदिरापासून अंदाजे दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या गंडकी नदीमध्ये हे शाळिग्रामाचे दगड सापडतात. अनेकदा त्यावर काही चक्रं किंवा विविध आकार कोरलेले असतात. शाळिग्रामाच्या पूजेबाबतही भारतीय समाजात काही नियम पाळले जातात. शाळिग्राम म्हणजे भगवान विष्णूच असल्यानं त्याला तुळशीचं पान वाहिलं जातं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ayodhya ram mandir, Local18, Religion, Uttar pardesh