मुंबई , 02 फेब्रुवारी: हिंदू धर्म संस्कृति नुसार घरातील सकाळ संध्याकाळच्या देवपूजेला खूप महत्व आहे. देवपूजा करताना नक्की दिवा कोणता लावावा तेलाचा दिवा लावावा की तुपाचा दिवा लावावा या विषयी अनेक समज गैरसमज आहेत.
तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा या दोन्ही दिव्यांचे महत्त्व वेगवेगळे आहे. तुपाचा दिवा सकारात्मक उर्जा निर्माण करतो. त्यामुळे आरती करतांना शुध्द तुपाच्या दिव्यानेच करावी. पंरतु संध्याकाळी देवाजवळ दिवा लावताना तेलाचा दिवा लावावा कारण तेलाचा दिवा नकारात्मक उर्जा नष्ट करतो. अर्थात आपल्याला दोन्ही गोष्टींची गरज असते . वास्तुशास्त्रानुसार सकाळी आपण सगळ्या कामाची सुरुवात करतो. तेव्हा सकारात्मक उर्जेची गरज असते. म्हणून देवपूजा करताना शुद्धतुपाचा दिवा लावल्यास उत्तम. त्यातही एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जर चांदीच्या निरंजनात चांगल्या तुपाची वात लावल्यास अतिउत्तम परिणाम मिळतात.
तसेच रात्रीच्या वातावरणात नकारात्मक उर्जेचा प्रभाव जास्त असतो तो कमी करायचा असल्यास तिळाच्या तेलाच दिवा लावावा. आपण तुळशी जवळ जो दिवा लावतो तो तिळाच्या तेलाचा लावल्यास घरात नकारात्मक उर्जा प्रवेश करीत नाही. आणि अजून लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे. तेलाचा आणि तुपाचा दिवा वेगवेगळा असावा. ज्यांना या गोष्टी करणे शक्य आहे त्यांनी नक्कीच कराव्यात कारण त्याचे शुभ परिणाम होतात .आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी कुठल्याही तेलाचा दिवा लावला तरी चालेल पण सकाळी व संध्याकाळी दिवा लावा.
योगिनी डॉ स्मिता राऊत
ज्योतिषी
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.