जाहिरात
मराठी बातम्या / देश / धक्कादायक! प्रार्थना म्हणताना हार्ट अ‍ॅटॅकने तरुण शिक्षकाचा मृत्यू

धक्कादायक! प्रार्थना म्हणताना हार्ट अ‍ॅटॅकने तरुण शिक्षकाचा मृत्यू

धक्कादायक! प्रार्थना म्हणताना हार्ट अ‍ॅटॅकने तरुण शिक्षकाचा मृत्यू

अगदी कमी वयाच्या तरुणांना हार्ट अ‍ॅटॅक येऊन त्यांचा मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना नाही.

  • -MIN READ Trending Desk Uttar Pradesh
  • Last Updated :

    मुंबई : आधी वयस्कर व्यक्तींमध्ये दिसणारे हार्ट अ‍ॅटॅक , मधुमेहासारखे आजार आता तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणाने दिसून येत आहेत. अगदी विशीतल्या तरुणांनाही हार्ट अ‍ॅटॅकने जीव गमवावा लागतोय. अलीकडेच उत्तर प्रदेशातमध्ये एका तरुणाचा हार्ट अ‍ॅटॅकने मृत्यू झाला. त्या तरुणाचं वय फक्त 23 वर्षं होतं. बरेली येथील एका शाळेत शिक्षक म्हणून काम करणाऱ्या तरुणाचा शनिवारी प्रार्थना म्हणत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. शाही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुभाषनगर भागातील जे. के. स्कूल अकादमीमध्ये प्रार्थना सुरू असताना ही धक्कादायक घटना घडली आहे. गोविंदला हृदयविकाराचा झटका येण्याच्या काही क्षण आधी, तो मुलांना ग्राउंडमध्ये एकत्र आणत होता. मग त्याने प्रार्थना सांगण्यास सुरुवात केली. मात्र अचानक त्याची प्रकृती बिघडली आणि तो खाली कोसळला, त्यानंतर त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्याची तब्येत बिघडत असल्याचे पाहून रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला वैद्यकीय महाविद्यालयात रेफर केलं, मात्र दुर्दैवाने डॉक्टरांना त्याला वाचवण्यात अपयश आलं आणि त्याचं निधन झालं. या अचानक घडलेल्या दुःखद घटनेमुळे गोविंदच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शोकाकुल अवस्थेत असलेल्या कुटुंबीयांनी गोविंदचे अंतिम संस्कार केले.

    धक्कादायक! चालता चालता शिंकला तिथंच जीव गेला; तरुणाच्या मृत्यूचा LIVE VIDEO

    अगदी कमी वयाच्या तरुणांना हार्ट अ‍ॅटॅक येऊन त्यांचा मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना नाही. मागच्या काही दिवसांत अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशामधील वाराणसी येथे 25 नोव्हेंबर रोजी घडली होती. एका लग्नाच्या कार्यक्रमात नाचत असताना एका 40 वर्षीय व्यक्तीचा हार्ट अ‍ॅटॅकने मृत्यू झाला होता. मनोज विश्वकर्मा असं मृताचं नाव होतं. तो पिलपाणी कटराजवळील एका लग्नाच्या कार्यक्रमात कुटुंबीयांसह डान्स करत असताना त्याला हार्ट अ‍ॅटॅक आला आणि त्याचं निधन झालं. अशीच आणखी एक घटना मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातील एका मंदिरात काही मागच्या आठवड्यात ही घटना घडली. मंदिरात प्रार्थना करत असताना हृदयविकाराच्या झटक्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

    साई बाबांच्या चरणी डोकं टेकवलं अन् उठलाच नाही; भक्ताचा हृदयद्रावक शेवट, Shocking Video

    या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्या व्यक्तीला हार्ट अ‍ॅटॅक आल्याचं कैद झालं होतं. ही घटना मागच्या गुरुवारी घडली होती. त्या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आलं होतं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं होतं. हार्ट अ‍ॅटॅक हा अलीकडच्या काळातील सर्वात जीवघेणा आजार ठरतोय. अनेकांना या आजारामुळे आपला जीव गमवावा लागत आहे.कमी वयातील लोकांमध्ये हार्ट अ‍ॅटॅकचं वाढतं प्रमाण ही चिंतेची बाब ठरत आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात