लखनऊ, 04 डिसेंबर : मृत्यू कुठे, कसा, कुणाला गाठेल हे कुणीच सांगू शकत नाही. अशाच एका मृत्यूचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका तरुणाला चालता चालता मृत्यूने गाठलं आहे. चालताना या तरुणाला शिंक आली, त्यानंतर तो तिथंच कोसळला आणि त्याचा जीव गेला. मृत्यूची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तरुणाला ज्या पद्धतीने मृत्यू आला ते पाहूनच तुम्हाला धक्का बसेल. मित्रांसोबत मजामस्ती करत हा तरुण चालत होता. एक शिंक आली आणि काही वेळातच त्याचा जीव गेला. त्याच्या मित्रांनाही धक्का बसला. व्हिडीओ पाहून सर्वजण शॉक झाले आहेत. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक छोटासा रोड दिसतो आहे. त्यावरून काही तरुण चालत येताना दिसत आहेत. हसत-बोलत हे तरुण येत आहेत. चालता चालता एका तरुणाला शिंक येते. हा तरुण आपल्या नाकावर दोन्ही हात ठेवून शिंकताना दिसतो. त्यानंतर तो आपल्या गळ्याला हातही लावतो. शिंक आल्यानंतर त्याला कदाचित घशात काहीतरी झाल्यासारखं वाटलं असावा. काही पावलं ते लोक पुढे चालत जातात आणि तो तरुण आपल्या एका मित्राच्या खांद्यावर आपला एक हात ठेवतो आणि तेव्हाच अचानक जमिनीवर कोसळतो. हे वाचा - Shocking! नवरदेवाला वरमाळा घालताच भयानक घडलं; लखनऊमध्ये नवरीचा स्टेजवरच मृत्यू आता हसत बोलत चालणारा तरुण… त्याला असं अचानक काय झालं, असा प्रश्न आपल्याला पडतो. त्याच्यासोबत असणारे मित्रही त्याला काय झालं म्हणून घाबरतात. त्याला धरून ते एका बाजूला घेऊन जातात.
ही घटना उत्तर प्रदेशच्या मेरठमधील आहे. या तरुणाला हार्ट अटॅक आल्याची शक्यता वर्तवली जाते आहे.