यवतमाळ, 26 मार्च : देशभरात कोरोना (Coronavirus) संकट वाढत असून आज महाराष्ट्रात दोघांचा कोरोनामुळे (Covid - 19) मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोंर आली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन (Lockdown) जाहीर केलं आहे. यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन झाल्यानंतर सर्व राज्यांच्या आणि जिल्ह्यांच्या सीमा सील करण्यात आल्या आहे. शिवाय लोकांना प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. अशातच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तेलंगणा व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर यवतमाळ जिल्ह्यातील पिंपळखुटी येथे राज्य तपासणी नाक्यावर माणसांनी कोंबलेले कंटेनर सीमा पार करताना आढळून आले.
संबंधित - दिवसभरात 15, एकूण 77 : वुहानसारखं मुंबई होणार देशातलं कोरोनाव्हायरसचं केंद्र?
परिणामी गेल्या दोन दिवसांपासून लोकांना वाहतूक करणे अवघड झाले आहे. अनेक कामाच्या ठिकाणी मजूर, कामगार अडकल्याचे वृत्तही समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक बाब समोर आली आहे. तेलंगणा-महाराष्ट्राच्या (Telangana-Maharashtra) सीमेवर एका कंटेनरमध्ये कोंबून माणसांची वाहतूक केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. या एका कंटेनगरमंध्ये तब्बल 300 नागरिकांना कोंबून भरलं होतं. हा कंटेनगर नागरिकांना हैद्राबादहून राजस्थानला घेऊन जात होता. या कंटेनरचा तपास केल्यानंतर पोलिसांना ही बाब लक्षात आली. याआधीही अनेक माणसांची वाहतूक अशा प्रकारे केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संबंधित - लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरांवर काय परिणाम,जाणून घ्या आजचे दर
अनेक ठिकाणी कंत्राटदारांनी मजूरांना राहण्याची सोय करुन दिली नाही. अशावेळी काही अगतिक मजूर चालत शेकडो किमीचा प्रवास करीत असल्याचे आढळून आले. शिवाय काही मजूर अशाप्रकारे कंटेनरमध्ये कोंबून आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हा एकमेव पर्याय असल्याचे सांगितले जाते. मात्र दुसरीकडे अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचे हा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.