Home /News /national /

चिंताजनक बातमी, देशातली आतापर्यंतची कोरोनाची धक्कादायक आकडेवारी समोर

चिंताजनक बातमी, देशातली आतापर्यंतची कोरोनाची धक्कादायक आकडेवारी समोर

आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4,10,461 वर पोहोचली आहे.

    मुंबई, 21 जून : जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार उडवला आहे. भारतातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस  वाढतच चालली आहे. आज आलेल्या आकडेवारीनुसार, देशात  गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 15413 रुग्ण आढळून आली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशभरात लॉकडाउन करण्यात आलं होतं. लॉकडाउनमधून बाहेर पडण्यासाठी अनलॉक करण्यात आले आहे. देशात बंद पडलेले व्यवहार सुरू झाले आहे. परंतु, कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. धक्कादायक! गर्भवती महिलेला खांद्यावरून नेण्याची वेळ, जंगलात वाटेतच झाली प्रसूती आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4,10,461 वर पोहोचली आहे. तर  अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1,69,451 इतकी आहे.  गेल्या 24 तासामध्ये 15,413 रुग्णांची वाढ झाली आहे. आतापर्यंतही ही सर्वाधिक रुग्णांची संख्या असल्याचं समोर आले आहे. तर देशभरात 306 लोकांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी गेल्या 24 तासातील असून चिंताजनक आहे. तर देशभरात आतापर्यंत  एकूण 13254 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाला हरवण्यासाठी योग आणि प्राणायाम महत्त्वाचा - मोदी दरम्यान,  जगभरात आज आंतरराष्ट्रीय योग दिवस (Intertnational Yoga Day 2020) साजरा केला जात आहे. कोरोना व्हायरसमुळे यंदा पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय योग दिवस हा डिजिटल पद्धतीनं साजरा केला जात आहे. देशभरात कोरोनाचा संसर्ग आणि संक्रमण टाळण्यासाठी पहिल्यांदाच डिजिटल स्वरुपात साजरा केला जात आहे. मोदी सरकार 1000 रुपये भाड्याने देणार घर, वाचा कुणाला होणार फायदा आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जगतेला संबोधित केलं आहे. यावेळी त्यांनी कोरोनाला हरवण्यासाठी योग आणि प्राणायाम कसा महत्त्वाचा आहे हे सांगितलं. योग केवळ शारीरिकच नाही तर मानसिक स्वास्थही चांगलं ठेवण्यासाठी मदत करतो. त्यामुळे प्रत्येकानं दिवसातला काही वेळ योग आणि प्राणायाम करायला हवा. योग आणि प्राणायाम करून आपण कोरोनाविरुद्ध लढा देऊ शकतो,  असंही मोदी म्हणाले. संपादन - सचिन साळवे
    First published:

    Tags: Corona, India

    पुढील बातम्या