धक्कादायक! गर्भवती महिलेला खांद्यावरून नेण्याची वेळ, जंगलात वाटेतच झाली प्रसूती

धक्कादायक! गर्भवती महिलेला खांद्यावरून नेण्याची वेळ, जंगलात वाटेतच झाली प्रसूती

या घटनेने अद्याप सदर गावापर्यंत रस्त्या न पोहोचवू शकलेल्या शासन आणि प्रशासनाची मान शरमेणे खाली घालवली आहे.

  • Share this:

चिपळूण, 21 जून : रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातील मौजे पेढांबे वाडी या धनगर वाडीत धक्कादायक प्रकार घडला आहे. एक गर्भवती महिलेला खांद्यावरून डोलीतून हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना घनदाट जंगलात वाटेतच त्या महिलेची प्रसूती झाली आहे.

चिपळूण तालुक्यातील या गावात जाण्यासाठी रस्ता नाही. डोंगर कपारीत वसलेल्या या वाडीत 20 ते 25 घरे आहेत. मात्र अनेकवेळा मागणी करून देखील या वाडीत रस्ता गेला नाही. या ठिकाणी जर कोण आजारी पडलं तर त्यांना प्राचीन पद्धतीने डोली करावी लागते आणि त्यातून जवळपास 5 ते 6 किलोमीटर खांद्यावरून न्यावे लागते.

अशा प्रकारे शनिवारी सकाळी या वाडीतील एक गर्भवती महिलेला वेदना जाणवू लागल्या आणि त्या महिलेला नेहमीप्रमाणे डोलीतून दवाखान्यात घेऊन जात असताना अर्ध्या वाटेतच घनदाट जंगलात त्या महिलेची प्रसूती झाली. सौ मनीषा संतोष शेळके असे या महिलेचे नाव आहे.

हेही वाचा - दोन गटात तुफान राडा, तरुणाच्या डोक्यात घातला दगड; दुचाकी पेटवली

महिलेला जंगलातच ठेऊन गावातून आशा सेविकांना बोलावण्यात आले आणि घनदाट जंगलात पावसाच्या दिवसात या महिलेची प्रसूती झाली. ती महिला आणि तिने जन्म दिलेले बाळ आता सुखरूप आहे. मात्र या घटनेने अद्याप या गावापर्यंत रस्त्या न पोहोचवू शकलेल्या शासन आणि प्रशासनाची मान शरमेणे खाली घालवली आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: June 21, 2020, 10:25 AM IST

ताज्या बातम्या