जाहिरात
मराठी बातम्या / देश / Shocking News : घरात आदर मिळेना, मुलगा IAS असणाऱ्या कोट्यधीश बापाने गाठलं वृद्धाश्रम

Shocking News : घरात आदर मिळेना, मुलगा IAS असणाऱ्या कोट्यधीश बापाने गाठलं वृद्धाश्रम

वद्धाश्रमात जाण्याची आली वेळ

वद्धाश्रमात जाण्याची आली वेळ

Shocking News : मुलगा IAS अधिकारी, स्वत: कोट्यधीश असून गेले वृद्धाश्रमात; कारण घरात आदर मिळेना

  • -MIN READ Local18 Agra,Uttar Pradesh
  • Last Updated :

कामिर कुरैशी प्रतिनिधी आगरा : मुलाला तळहाताच्या फोडासारखं जपलं शिकवलं मेहनतीनं IAS अधिकारी केलं. मात्र मुलगा अधिकारी होताच एक वडिलांना अभिमान वाटावा त्या ऐवजी त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. याचं कारण म्हणजे त्यांना त्यांच्याच घरात आदर मिळणं बंद झालं आणि अखेर नाईलाजाने वृद्धाश्रम गाठण्याची वेळ त्यांच्यावर आली. बागवान चित्रपटातले सीन तुमच्या डोळ्यासमोर उभे राहतील अशी अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. ज्यात अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी दोघेही आपल्या मुलांसोबत वेगळे राहायला जातात, करोडोंचे मालक असूनही त्यांना मान-सन्मान मिळत नाही.

भाऊ म्हणाला, त्याला भेटू नको, पण तिने ऐकलं नाही, अखेर बहिणीसोबत घडलं खतरनाक कांड!

ही धक्कादायक घटना आग्रा इथे घडली आहे. यामुळे IAS अधिकारी चर्चेचा विषय ठरला आहे. त्या वृद्ध व्यक्तीनं सांगितलं की माझं एक मुलगा IAS अधिकारी तर दुसरा व्यापारी आहे. तरीही मला घरात मान मिळाला नाही.

News18लोकमत
News18लोकमत

आग्रा येथील कमला नगर पोलीस स्टेशन परिसरात राहणारे ७८ वर्षीय वृद्ध बँकेतून निवृत्त झाले आहेत.त्याचा मोठा मुलगा आयएएस आहे. कोट्यवधींची संपत्ती आणि जागा सगळं काही आहे मात्र मान सन्मान नाही. या वयातही बायको मोबाईलवर बिझी राहते, काहीतरी बोलते आणि मग भांडण होतं असं हे वृद्ध सांगत होते.

लग्नाचे आमिष देऊन शारिरीक संबंधही ठेवले, पण गर्लफ्रेंड गर्भवती झाली अन्…

धाकटा मुलगा पैसे देऊन वेगळा झाला. मोठा मुलगा आयएएस आहे, घरी आल्यावर अपमान करतो. आता मला त्या घरात राहायचे नाही. मला इथेच राहायचे आहे असं या वृद्ध व्यक्तींने वृद्धाश्रमात रडत रडत सांगितलं. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात