कोरोनामुक्त रुग्ण पुन्हा कोरोनाग्रस्त झाल्यास त्याच्यामार्फत व्हायरस पसरतो का?

कोरोनामुक्त रुग्ण पुन्हा कोरोनाग्रस्त झाल्यास त्याच्यामार्फत व्हायरस पसरतो का?

दक्षिण कोरियात (South Korea) कोरोना रुग्णांचा (Corona patient) अभ्यास करण्यात आला.

  • Share this:

सिऊल, 20 मे : कोरोनाव्हायरस (coronavirus) झपाट्यानं पसरतो आहे. मात्र त्यात तुलनेत रुग्ण (corona patient) बरेही होत आहेत. मात्र काही रुग्णांना पुन्हा कोरोनाव्हायरसचं निदान होतं आहे, त्यामुळे अशा रुग्णांपासून कोरोनाव्हायरस पसरण्याचा धोका आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. दक्षिण कोरियात (south korea) नुकतंच याबाबत संशोधन झालं. पुन्हा कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या रुग्णामार्फत व्हायरस पसरत नाही, असं या संशोधनांच्या अभ्यासकांनी म्हटलं आहे.

एकदा बऱ्या झालेल्या रुग्णाला त्याला पुन्हा कोरोनाव्हायरसची लागण झाल्यास त्याच्यामार्फत कोरोना व्हायरस पसरत नाही, असं या अभ्यासात दिसून आलं आहे.

हे वाचा - फक्त 15 दिवसांत तब्बल 50 हजार आकडा पार; असा वाढतोय भारतात कोरोना रुग्णांचा ग्राफ

कोरियातील सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने हा अभ्यास केला. यामध्ये 285 कोरोना रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. हे रुग्ण सुरुवातीला पॉझिटिव्ह होते, त्यानंतर उपचारानंतर त्यांची टेस्ट नेगेटिव्ह आली. मात्र बरे झाल्यानंतर ते पुन्हा पॉझिटिव्ह झाले. या सर्वांचे नमुने घेण्यात आलेत. त्यामध्ये व्हायरसची संख्या वाढत नसल्याचं दिसलं. याचा अर्थ या रुग्णांमार्फत इतर असंक्रमित लोकांमध्ये व्हायरस पसरत नाही, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

एकदा कोरोनातून बरे झालेले रुग्ण पुन्हा पॉझिटिव्ह सापडले तर ते कोरोनाचा प्रसार करण्यात सक्षम नाहीत. त्यांच्यामुळे इतरांना व्हायरसचा धोका नाही, असं संशोधक म्हणालेत.

हे वाचा - वेंटिलेटर काढताच कोरोना रुग्णानं गर्लफ्रेंडला घातली लग्नाची मागणी; ती म्हणाली...

जगभरात आतापर्यंत 19 लाख 70 हजारपेक्षा जास्त कोरोना रुग्ण बरे झालेत. तर भारतात 42 हजारपेक्षा जास्त रुग्ण बरे झालेत. भारतात जशी कोरोनाव्हायरसची प्रकरणं वाढत आहेत, त्याच तुलनेत रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसात जेव्हा कोरोनाची प्रकरणं वाढू लागली तेव्हा रिकव्हरी रेट 25 टक्क्यांच्या जवळपास होता. आता तो 38.7% झाला आहे. उथ्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणामध्ये रिकव्हरी रेट 58% ते 63% दरम्यान आहे. तर पंजाब आणि हरयाणामध्ये सर्वात जास्त 70% रिकव्हरी रेट आहे.

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: May 20, 2020, 2:06 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading