धक्कादायक! बंगालमध्ये कोरोनाचा पहिला बळी, भारतातील मृतांची संख्या 9 वर

धक्कादायक! बंगालमध्ये कोरोनाचा पहिला बळी, भारतातील मृतांची संख्या 9 वर

कोरोना व्हायपरस झपाट्याने पसरत आहे. देशात आतापर्यंत 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 मार्च : देशभरात कोरोनाच्या (Coronavirus) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याबाबत केंद्र सरकारने नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहन केलं आहे. त्यादरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बंगालमध्ये (Bangal) पहिला कोरोना (Covid - 19) पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यानुसार देशात मृतांची संख्या 9 पर्यंत पोहोचली आहे.

उत्तर कोलकाता येथील डम डम येथील 55 वर्षांच्या रूग्णवर साल्ट लेक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि दुपारी 3.35 च्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रुग्ण व्हेंटिलेटरवर होता आणि शरीरातील अवयव एकामागून एक निकामी झाल्याचे त्याचा मृत्यू झाला. या मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्या तिघांनाही क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांची तपासणी करण्यात आली असून अद्याप त्यांचे अहवाल हाती आलेले  नाहीत.

संबंधित - कोरोनाग्रस्त महिलेचा पुणे ते वेल्हा गावापर्यंत प्रवास, तब्बल 26 गावं क्वारंटाइन

आतापर्यंत भारतात 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. त्याशिवाय 300 हून जास्त जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. या पार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. केंद्र सरकारकडून या नियमांचे पालन करण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र नागरिक याक़डे दुर्लक्ष करीत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सध्या इटलीमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले असून मृतांचा आकडाही येथे सर्वात जास्त आहे. त्यामुळे भारतात अशी परिस्थिती ओढावू नये यासाठी नागरिकांनी स्वत: काही नियमांचे पालन करीत घरातच राहणे योग्य आहे. अन्यथा हा आजार पसरल्याने मोठं संकट उभं राहू शकतं

सध्याच्या घडीला महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा हा 89वर गेला आहे. गेल्या काही दिवसांत ही संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात तिघांचा मृत्यू झाला आहे. नागरिकांना घरात राहूनच काम करणं गरजेचं आहे. लॉकडाऊनचे पालन न करणाऱ्यांवर राज्य सरकारडून कायदेशीर कारवाई करण्यात येऊ शकते.

संबंधित - WHO सल्ल्यानंतरही वैद्यकीय उपकरणांची निर्यात होती सुरुच, राहुल यांची PM वर टीका

First published: March 23, 2020, 4:24 PM IST

ताज्या बातम्या