पुणे, 23 मार्च : पुण्यातील वेल्हा तालुक्यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्य सरकारकडून नागरिकांना घरात राहण्याचं वारंवार आवाहन केलं जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव (Corornavirus) वाढू नये यासाठी हे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर पुण्यातील (Pune) वेल्हा तालुक्यातील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह (Covid - 19) आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दक्षतेचा भाग म्हणून अख्खं गाव क्वारंटाइन (Quarintine) गेलं आहे. याशिवाय गावागावांतून नागरिकांचा प्रवास झाल्याची शक्यता असल्याने आजूबाजूची तब्बल 26 गावं क्वारंटाइन करण्यात आली आहे. वेल्हे तालुक्यातील पानशेत परिसरातील एका 41 वर्षीय महिला कोनोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्याने राज्य सरकारने ही खबरदारी घेतली आहे. याशिवाय या गावांमध्ये येण्यासा नागरिकांना बंदी करण्यात आली आहे.
संबंधित - पुण्यात 3 वाजल्यापासून अखेर पूर्ण लॉकडाऊन, बेशिस्तपणाला लगाम लावण्यासाठी निर्णय
पानशेत परिसरातील साईव, गोरडवाडी, वडाळवाडी आदी गावांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. शिवाय नागरिकांची तपासणी, नोंदणी करण्यासाठी गावांमध्ये चेक पोस्ट तयार करण्यात आले आहेत. कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्यात येत आहे. या परिसरात औषध फवारणी केल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
कोरोना पॉझिटिव्ह आढळलेली ही महिला मूळची पुण्याची आहे. ती कामानिमित्त वेल्हा तालुक्यात गेली होती. ज्या ज्या गावांत ती गेली आणि प्रवासादरम्यान ज्या गावकऱ्यांशी ती संपर्कात आली, त्यांचा शोध घेतला जात आहे.
सध्याच्या घडीला महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा हा 89वर गेला आहे. गेल्या काही दिवसांत ही संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात तिघांचा मृत्यू झाला आहे. नागरिकांना याबाबत अधिका काळजी घेणं गरजेचं आहे. लॉकडाऊनचे पालन करीत नागरिकांनी घरात राहणे अधिक सुरक्षित आहे
संबंधित - Janata curfew पोलिसांसाठी नाश्ता घेऊन आल्या महिला, पाहा VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india