WHO च्या सल्ल्यानंतरही वैद्यकीय उपकरणांची निर्यात होती सुरुच, राहूल गांधींची पंतप्रधानांवर सडकून टीका

WHO च्या सल्ल्यानंतरही वैद्यकीय उपकरणांची निर्यात होती सुरुच, राहूल गांधींची पंतप्रधानांवर सडकून टीका

राहुल गांधींनी ट्विट करीत हा गुन्हेगारी कट असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 मार्च : 22 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या विनंतीवरून भारतीयांनी जनता कर्फ्यूचं पालन केलं. सध्या देशातील आरोग्य यंत्रणा कोरोनाशी लढत आहे. त्यांना धन्यवाद देण्यासाठी नागरिकांनी 22 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता घराबाहेर येऊन टाळ्या वाजवाव्यात असं आवाहन मोदींनी केलं होतं.

मात्र कोविड (Covid - 19)शी दोन करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना येत्या काळात वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा भासण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात 'कारवान'मध्ये एक बातमी प्रसिद्ध झाली आहे. त्याचा दाखला देत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ट्विटरच्या माध्यमातून कडाडून टीका केली आहे.

संबंधित - 'कोरोना'शी लढणाऱ्या मुख्यमंत्री भावाचं राज ठाकरेंनी केलं कौतुक, म्हणाले...

कोरोनाशी लढा देण्यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आवश्यक असलेल्या उपकरणांचा साठा करुन ठेवा, असा सल्ला तीन दिवसांपूर्वी WHO ने दिला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत 19 मार्चपर्यंत वेंटिलेटर, सर्जिकल मास्क आदी उपकरणांच्या निर्यातीची परवानगी कशी दिली? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. ही फसवणूक कोणत्या अटींवर करण्यात आली? हा गुन्हेगारी कट नाही का? असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केली आहे.

काय लिहिलयं कारवानच्या लेखात -

नरेंद्र मोदींनी (18 मार्च या दिवशी आवाहन केलं) देशाच्या आरोग्य कर्मचार्‍यांना पाठिंबा देण्यासाठी नागरिकांना 22 मार्च रोजी आपआपल्या बाल्कनीतून टाळ्या वाजविण्याचे आवाहन करीच "जनता कर्फ्यू" लावावे असे सांगितले होते. परंतु दुसऱ्याच दिवशीच जागतिक आरोग्य संघटनेने देशातील पीपीईच्या पुरवठ्यात प्रतिबंध करणारी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केल्यानंतर देशांतर्गत उत्पादन केलेल्या पीपीईच्या निर्यातीला बंदी घालण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली.

संबंधित - माणुसकी मेलीये का? 'कोरोना कोरोना' म्हणत मणिपूरच्या विद्यार्थिनीवर थुंकला

First published: March 23, 2020, 3:43 PM IST

ताज्या बातम्या