मराठी बातम्या /बातम्या /देश /

कोरोनाग्रस्तांना दिला जातोय विशेष आहार; Healthy diet ने रुग्ण करत आहेत व्हायरसवर मात

कोरोनाग्रस्तांना दिला जातोय विशेष आहार; Healthy diet ने रुग्ण करत आहेत व्हायरसवर मात

पोलीस, सफाई कर्मचारी, डॉक्टर यांच्याप्रमाणे रुग्णालयाच्या किचनमधील (hospital kitchen) कोरोना योद्धाही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

पोलीस, सफाई कर्मचारी, डॉक्टर यांच्याप्रमाणे रुग्णालयाच्या किचनमधील (hospital kitchen) कोरोना योद्धाही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

पोलीस, सफाई कर्मचारी, डॉक्टर यांच्याप्रमाणे रुग्णालयाच्या किचनमधील (hospital kitchen) कोरोना योद्धाही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

  • Published by:  Priya Lad
धीरेंद्र चौधरी/ रोहतक, 14 मे : कोरोनाव्हायरसवर (coronavirus) भले अद्याप लस नाही, औषध नाही मात्र त्याशिवायही कोरोना रुग्ण बरे होत आहेत आणि त्याचं एक मोठं कारण आहे ते म्हणजे हेल्दी डाएट (Healthy Diet). पोलीस, सफाई कर्मचारी, डॉक्टर यांच्याप्रमाणे रुग्णालयाच्या  किचनमधील कोरोना योद्धाही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. किचनमधील कोरोना योद्धांनी दिलेल्या योग्य आहारामुळे कोरोना रुग्ण व्हायरसशी लढण्यास सक्षम होत आहे. हरयाणातील पीजीआई रोहतकमधील (Rohatak PGI) डायटिशिअन (Diteician) द्वारा रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना रुग्णांना असा विशेष आहार दिला जातो आहे. ज्यामुळे रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते आहे. तज्ज्ञांच्या मते, कोरोनाव्हायरस व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीला प्रभावित करतो, ज्यामुळे त्यांचा जीवही जाऊ शकतो.  मात्र रोहतक पीजीआईमध्ये भरती असेलल्या कोरोना रुग्णांना लवकरात लवकर बरं करण्यासाठी पीजीआईमधील किचन महत्त्वाचं ठरत आहे. या किचनमध्ये जवळपास 35 कर्मचारी काम करत आहेत, जे कोरोना रुग्णांसह त्यांची देखभाल करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठीही जेवण तयार करतात. हे वाचा - तुम्हीही तुमच्या मर्जीने डाएट करता का? मग 'हे' वाचाच आहारतज्ज्ञ डॉ. ज्योती यांनी सांगितलं की, पीजीआईच्या किचनमधील त्यांची टीम कोरोना रुग्णांच्या आहाराची विशेष काळजी घेते आहे. दररोज त्यांच्या किचनमध्ये पौष्टीक आहार तयार करून रुग्ण आणि आयसोलेशन स्टाफला पाठवला जातो. निश्चित केलेली प्रक्रिया आणि स्वच्छतेची काळजी घेत पूर्ण काम केलं जातं. दररोज घरी जाण्यापूर्वी आहारतज्ज्ञ दुसऱ्या दिवशीचा मेन्यू ठरवून त्यासाठी लागणारी सामग्री जमा करून ठेवली जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कुक किचनमध्ये येऊन जेवण बनवतो. किचनमधील कर्मचारी पहाटे पाच वाजल्यापासून रुग्णांसाठी तयार करण्यात आलेला मेन्यू फॉलो करतात आणि जेवण बनवायला सुरुवात करतात. डाएट प्लाननुसार दिलं जातं जेवण डाएटिशिअन डॉ. ज्योती आणि त्यांच्या टीममार्फत तयार करण्यात आलेल्या डाएट प्लाननुसार रुग्ण आणि आयसोलेशन वॉर्डमधील स्टाफला दिवसातून तीन वेळा आहार दिला जातो. ज्यामध्ये नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणाचा समावेश आहे. हे वाचा - अवघ्या एक वर्षाचा Baby Chef शिकवतोय रेसिपी, व्हिडीओ पाहून म्हणाल So sweet रुग्णांना सकाळी 6 वाजता बेड टी आणि संध्यााकाळीदेखील चहा दिला जातो. नाश्त्यामध्ये रुग्णांना सँडविच, पनीर, दलिया यासह दूध दिलं जातं. दुपारी 12 वाजता चपाती, भात, डाळ, पनीर, भाजी, दही आणि फळं दिली जातात. रात्रीच्या जेवणात चपाती, डाळ, भाजी आणि एखादी स्वीट डीश म्हणजे काहीतरी गोड पदार्थ असतो. संपूर्ण दिवसात रुग्णांसाठी आवश्यक असलेला पुरेसा आहार दिला जातो कारण यात प्रोटिन आणि व्हिटॅमिन्सची मात्र भरपूर असते. डिस्पोजेबल प्लेटमध्ये जातं अन्न विशेष म्हणजे हे जेवण डिस्पोजेबल प्लेटमध्ये दिलं जातं. स्पेशल तयार करण्यात आलेला हा आहार दररोज जवळपास एक हजार लोकांपर्यंत पोहोचतो. ज्यात कोरोना रुग्ण, सामान्य वॉर्डमधील रुग्ण आणि आयसोलेशन वॉर्डमध्ये तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जवळपास बारा रुग्ण बरे झाले पीजीआईच्या या खास डाएटमुळे आतापर्यंत जवळपास 12 रुग्ण बरे झालेत, कारण आहार हळूहळू रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि कोरोना रुग्ण लवकर बरा होण्यात मदत होतो. डायटिशिअन रुग्णांच्या आयुष्यात एक महत्त्वाची भूमिका बजावत असतात. रुग्ण बरा होऊन त्याला डिस्चार्ज दिल्यानंतर सर्वात जास्त आनंद कुणाला होत असेल तर या किचनच्या कोरोना योद्धांना आहे. संपादन - प्रिया लाड हे वाचा - 'या' 10 राज्यांनी वाढवली सरकारची चिंता, असा आहे महाराष्ट्रातील रुग्णांचा ग्राफ
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या