मुंबई, 20 जुलै : आज सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे ते लोकसभेत होणाऱ्या अविश्वास ठरावाकडे. नरेंद्र मोदी सरकारविरूद्धच्या अविश्वास प्रस्तावावर सरकारच्या बाजून उभं राहण्याचा निर्णय काल शिवसेनेनं घेतला होता पण यात ते तळ्यात मळ्यात होते. त्यावर आता 10:30 वाजता शिवसेना ठोस भूमिका घेणार आहे. शिवसेना 10.30 वाजता आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. खासदारांशी चर्चा केल्यानंतर उद्धव ठाकरे भूमिका मांडणार असल्यास खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे.
त्यामुळे या सगळ्यात मोठ्या लढाईत शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचं सर्वांचं लक्ष लागून आहे. दरम्यान सेना मोदींविरोधात मतदानाची हिम्मत दाखवणार का ? असा प्रश्न आता सगळ्यांसमोर उपस्थित झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या अविश्वास ठरावासंबंधीत त्यांच्या खासदारांशी चर्चा करणार आहेत. आणि त्यानंतर ते त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत.
लोकसभेतली अविश्वास ठरावाची लढाई कोण जिंकणार? 11 वाजता चर्चेला सुरूवात
लोकसभेतील अविश्वास ठरावाच्या चर्चेआधी मोदींनी केलं 'हे' ट्विट
काल शिवसेनेचे लोकसभेतले मुख्य प्रतोद चंद्रकांत खैरे यांनी व्हिप काढून सरकारला समर्थन देण्यास सर्व खासदारांना सांगितलं होतं. 19 आणि 20 जुलैला अतिमहत्वाचं कामकाज संसदेत असल्याने सर्व खासदारांनी उपस्थित राहावं असं व्हिपमध्ये म्हटलं होतं. या प्रश्नवर चर्चा करण्यासाठी खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची भेटही घेतली होती.
पण दरम्यान, एरवी सत्तेतून बाहेर पडण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेचं मात्र अविश्वास ठरावावर अजूनही तळ्यात मळ्यात सुरु आहे. शिवसेनेच्या खासदारांना सभागृहात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. मात्र कुणाला मतदान करावं याबाबत पक्षाध्यक्ष आता 10:30ला खासदारांना आदेश देतील. त्यामुळे ही परिक्षा अटीतटीची असणार यात काही शंकाच नाही.
हेही वाचा...
सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या या गोष्टी करून पहा, तुम्हीही व्हाल श्रीमंत!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tdp