नवी दिल्ली, 20 जुलै : चंद्राबाबू नायडूंच्या तेलगू देसम पक्षानं प्रस्तावित केलेला अविश्वासाच्या ठरावावर आज लोकसभेत चर्चा होणार आहे. त्यामुळे लोकसभेतली अविश्वास ठरावाची लढाई कोण जिंकणार? 11 वाजता चर्चेला सुरूवात आहे. बहुमत सिद्ध करून मोदी पुन्हा त्यांचं वर्चस्व सिद्ध करणार की सरकार विरोधात मोट बांधण्यात विरोधक यशस्वी होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे. लोकसभेत या सगळ्यावर खडाजंगी होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट केलं आहे. आजचा दिवस खरंतर भाजप आणि विरोधी पक्षांसाठी महत्त्वाचा आहे. त्यावर मोदींनी ट्विट केलं आणि लिहलं की, ‘आज संसदीय लोकशाहीमध्ये हा अतिशय महत्वाचा दिवस आहे. मला खात्री आहे की या सगळ्यावर माझे सहकारी आणि खासदार योग्य वेळी उपस्थित राहूण विधायक, व्यापक आणि विनाव्यत्यय चर्चा करतील. भारतीय जनता आपल्यावर लक्ष ठेवून आहे त्यामुळे आपण त्यांच्यासाठी काम करू.’
Today is an important day in our Parliamentary democracy. I am sure my fellow MP colleagues will rise to the occasion and ensure a constructive, comprehensive & disruption free debate. We owe this to the people & the makers of our Constitution. India will be watching us closely.
— Narendra Modi (@narendramodi) July 20, 2018
खासगी वाहतूकदार, स्कूलबसेस देशव्यापी संपावर, संपाची झळ विद्यार्थ्यांना सगळ्यांना उत्सुकता असलेल्या अविश्वास ठरावाची चर्चा साधारणतः सकाळी 11 वाजता सभागृहात सुरू होणार आहे. तर संध्याकाळी पंतप्रधान मोदी उत्तर देतील अशी माहिती मिळतेय. दरम्यान 314 खासदारांचा पाठिंबा असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येतोय. तर विरोधकांनी आतापर्यंत 230 खासदारांची मोट बांधल्याचं समजतंय. मात्र अविश्वासाच्या ठरावाची ही लढाई फक्त बहुमत चाचणीपुरती मर्यादीत नाही. तर मोदींना विरोध करणाऱ्या एनडीएतल्या घटक पक्षांची नेमकी काय भूमिका असणार आहे हे आज स्पष्ट होईल. अर्थात त्यातलं पहिलं नाव आहे ते शिवसेनेचं. हेही वाचा… दूध आंदोलन मागे, राजू शेट्टींनी केली घोषणा पुष्करचं लग्न झालं नसतं तर… बिग बाॅस मराठीत मेघा का वागते आक्रमक?