मराठी बातम्या /बातम्या /देश /शिवसेनेची दिल्लीत धावाधाव! प्रसिद्ध गायक भूपिंदर सिंह यांचं निधन; आता आणखी एका व्हायरसची दहशत

शिवसेनेची दिल्लीत धावाधाव! प्रसिद्ध गायक भूपिंदर सिंह यांचं निधन; आता आणखी एका व्हायरसची दहशत

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

मुंबई, 18 जुलै : एकीकडे शिवसेनेचे आमदार फुटल्यानंतर आता त्यांचे खासदारही (Shivsena Mps) फुटीच्या मार्गावर आहेत. शिवसेनेच्या लोकसभेतल्या 18 खासदारांपैकी 12 खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं आहे. आपल्या सुंदर आवाजासाठी ओळखले जाणारे जेष्ठ गायक भूपिंदर सिंह यांचं निधन (singer bhupinder singh passes away) झाल्याची माहिती मिळत आहे. कोरोनापाठोपाठ भारतात मंकीपॉक्स व्हायरसने शिरकाव केला आहे. त्यात आता आणखी एका भयंकर व्हायरसबाबतची बातमी समोर आली आहे. देशविदेशातील घडामोडी काही मिनिटांत वाचा.

बॉलिवूडचा आणखी एक आवाज हरपला; प्रसिद्ध गायक भूपिंदर सिंह यांचं निधन

आपल्या सुंदर आवाजासाठी ओळखले जाणारे जेष्ठ गायक भूपिंदर सिंह यांचं निधन (singer bhupinder singh passes away) झाल्याची माहिती मिळत आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पत्नी मिताली सिंह यांनी या बातमीची पुष्टी दिल्याचं समोर येत आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

दिल्लीत शिवसेनेची 'भागमभाग'

एकीकडे शिवसेनेचे आमदार फुटल्यानंतर आता त्यांचे खासदारही (Shivsena Mps) फुटीच्या मार्गावर आहेत. शिवसेनेच्या लोकसभेतल्या 18 खासदारांपैकी 12 खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. शिवसेना खासदार राहुल शेवाळे या गटाचे प्रतोद असतील, तसंच हे खासदार पत्र घेऊन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Loksabha Speaker Om Birla) यांना उद्या भेटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

आमदारांपेक्षा शिवसेनेचे खासदार अधिक पीडित

आमदारांनंतर आता शिवसेनेचे खासदारही शिंदे (Eknath Shinde) गटाच्या वाटेवर असल्याने शिवसेनेत (Shivsena) खळबळ उडाली आहे. आता नागपूर जिल्ह्यातील (Nagpur News) रामटेक विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि 2019 मध्ये सेनेशी बंडखोरी केलेले आशिष जयस्वाल यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

अजूनपर्यंत आम्ही संयम बाळगलाय, पण आता ठाकरे.. : संजय राऊत

शिंदे गटाने शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केल्याची मोठी बातमी समोर आली आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद घेत शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

indore bus accident : मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एसटी महामंडळाची बस नर्मदा नदीत कोसळली आहे.  या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला आहे तर अजूनही 20 ते 25 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.  या अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

Corona, Monkeypox पेक्षाही भयंकर Marburg virus

कोरोनापाठोपाठ भारतात मंकीपॉक्स व्हायरसने शिरकाव केला आहे. त्यात आता आणखी एका भयंकर व्हायरसबाबतची बातमी समोर आली आहे. हा व्हायरस इतका खतरनाक आहे की उपचारासाही वेळ मिळाला नाही. लक्षणं दिसल्यानंतर रुग्णालयात दाखल होताच या व्हायरसने दोन बळी घेतले आहेत. मारबर्ग व्हायरसमुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

First published:

Tags: Top news india, Top news maharashtra