केपटाऊन, 18 जुलै : कोरोनापाठोपाठ भारतात मंकीपॉक्स व्हायरसने शिरकाव केला आहे. त्यात आता आणखी एका भयंकर व्हायरसबाबतची बातमी समोर आली आहे. हा व्हायरस इतका खतरनाक आहे की उपचारासाही वेळ मिळाला नाही. लक्षणं दिसल्यानंतर रुग्णालयात दाखल होताच या व्हायरसने दोन बळी घेतले आहेत. मारबर्ग व्हायरसमुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या घानामध्ये मारबर्ग व्हायरस थैमान घालतो आहे. या व्हायसची लागण झालेल्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, 26 वर्षांचा पुरुष 26 जून 2022 रोजी रुग्णालयात दाखल झाला. ज्याचा मृत्यू दुसऱ्यादिवशी 27 जूनला झाला. तर 51 वर्षांचा पुरुष 28 जून 2022 ला दाखल झाला त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. दोघांनाही एकाच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दोघांमध्येही डायरिया, ताप, मळमळ आणि उलटी अशी लक्षणं होती. तब्बल 98 लोक या रुग्णांच्या संपर्कात आले होते. याची लक्षणं इबोलासारखीच आहेत. हे वाचा - चार दिवसात मंकीपॉक्सचे 2 रुग्ण! पाच जिल्ह्यांत हाय अलर्ट, लक्षणे अन् प्रधिबंधात्मक उपाय माहितीय का? जागतिक आरोग्य संघटने ने दिलेल्या माहितीनुसार (WHO on Marburg), मारबर्ग हा विषाणू वटवाघळांद्वारे मनुष्यात पसरतो. मारबर्गची लागण झालेल्या व्यक्तीच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या द्रव पदार्थांमार्फत याचा प्रसार होतो. यात मग शिंकताना किंवा खोकताना बाहेर पडणाऱ्या कणांचाही समावेश आहे. यामार्फत हा विषाणू थेट दुसऱ्या व्यक्तीपर्यंत जाऊ शकतो. किंवा एखाद्या वस्तूच्या पृष्ठभागावर राहून, ती वस्तू हाताळणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात हा विषाणू जाऊ शकतो. एकंदरीतच कोरोनाप्रमाणेच या विषाणूचाही प्रसार होतो. मात्र, हा विषाणू कोरोनापेक्षाही अधिक घातक (Marburg dangerous than Corona) असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. याचा मृत्यूदर 88 टक्के आहे. यावरूनच तो किती खतरनाक आहे, ते समजतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.