मराठी बातम्या /बातम्या /देश /उत्तरप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढणार, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

उत्तरप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढणार, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

Sanjay Raut On Uttar Pradesh Assembly Election: शिवसेना खासदार (Shivsena MP) संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. उत्तरप्रदेशमध्ये येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत.

नवी दिल्ली, 29 जुलै: शिवसेना खासदार (Shivsena MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. उत्तरप्रदेशमध्ये (Uttar Pradesh) येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणुका (Assembly elections) होणार आहेत. या निवडणुकीसाठी तयारी सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी केलेल्या विधानाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. शिवसेना उत्तरप्रदेशमध्ये स्वबळावर लढणार असल्याचं वक्तव्य संजय राऊतांनी केलं आहे. एबीपी माझानं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी राजदची आघाडी होत असली तरी उत्तर प्रदेश बाबत आमची काही भूमिका नाही. सपा, राष्ट्रवादी आणि राजदच्या आघाडीला पाठिंबा का द्यावा? असा सवालच संजय राऊतांनी यावेळी उपस्थित केला.

पूरग्रस्तांसाठी महत्त्वाची बातमी, विजय वडेट्टीवारांनी दिली मोठी माहिती

उत्तरप्रदेशमध्ये शिवसेना निवडणूक लढवेल, पण स्वतंत्रपणे लढवेल. त्यांची आघाडी त्यांच्यापाशी. त्यांच्या आघाडीला शुभेच्छा. आम्ही उत्तर प्रदेशात आमच्या ताकदीनुसार निवडणूक लढवणार आहोत, असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे.

ममता बॅनर्जी यांचे शरद पवारांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. उद्धव ठाकरेंशी संबंध चांगले आहेत. ममतांचं म्हणणं आहे की, आधी एकत्र यावं. नेता कोण असावं हे नंतर ठरवता येईल. तृणमूल पक्षाची बैठक असल्यानं त्या बैठकीला उपस्थित राहू शकले नाही, असं संजय राऊत यांनी शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीवर भाष्य केलं आहे.

First published:
top videos

    Tags: Assembly Election 2021, Sanjay raut, Sanjay Raut (Politician), Shivsena, Uttar pradesh