मराठी बातम्या /बातम्या /देश /

शरद पवार की अरविंद केजरीवाल? कुणाच्या पक्षाला लवकर मिळाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा?

शरद पवार की अरविंद केजरीवाल? कुणाच्या पक्षाला लवकर मिळाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा?

राष्ट्रीय पक्षाचा दर्ज

राष्ट्रीय पक्षाचा दर्ज

26 नोव्हेंबर 2012 रोजी अरविंद केजरीवाल यांनी 'आम आदमी पार्टी' या राजकीय पक्षाची स्थापना केली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Khushalkant Dusane

मुंबई, 9 डिसेंबर : गुजरात विधानसभा निवडणुकीचा काल निकाल लागला. यात भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला. मात्र या निवडणुकीचा फायदा जसा भाजपला झाला, तसाच तो आणखी एका पक्षाला झाला आहे. आणि हा पक्ष म्हणजे आम आदमी पक्ष!

गुजरातच्या निवडणुकीत निकालानंतर आम आदमी पक्षाला फक्त 5 जागा मिळाल्या आहेत. मात्र, असे असले तरी त्यांचा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मात्र, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कसा दिला जातो? त्याचे काही निकष असतात का? आणि राष्ट्रीय पक्ष बनल्यावर काय फायदे होतात? हेच जाणून घेऊयात.

असा मिळतो राजकीय पक्षाचा दर्जा -

एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवायचा असेल तर त्या पक्षाला तीन महत्त्वाच्या अटींची पूर्तता करावी लागते. पहिली अट म्हणजे, या पक्षानं तीन वेगवेगळ्या राज्यांमधून लोकसभेतील किमान 2 टक्के जागा जिंकलेल्या असायला हव्यात. दुसरी अट म्हणजे लोकसभेत किमान 4 खासदार असावेत. तसंच ४ राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत किमान 6 टक्के मतं मिळायला हवीत. आणि तिसरी अट अशी की, त्या पक्षाला किमान 4 राज्यांमध्ये राज्य पक्षाचा दर्जा असावा. या तीन अटी जर एखाद्या पक्षानं पूर्ण केल्या तरच पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल केला जातो.

आम आदमी पक्षाने अनेक ठिकाणी काँग्रेसला बाजूला सारत यश मिळवल्याचं पाहायला मिळालं, तर दिल्ली महापालिकेत त्यांनी भाजपलाही धक्का दिला. आधी दिल्ली, मग पंजाब, त्यानंतर गोवा आणि आता गुजरात अशा 4 राज्यात वैध मतांपैकी सहा टक्क्यांहून अधिक मतं मिळवण्यात आम आदमी पक्षाला यश मिळालं आहे आणि त्यांचा राष्ट्रीय पक्ष बनण्याचा मार्ग मोकळा झाला.

हेही वाचा - Maharashtra MP Meet Narendra Modi : मोदींसोबतच्या बैठकीत महाराष्ट्राच्या खासदारांच मौन, शिवरायांच्या अपमानावर चर्चाच नाही

जेव्हा हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो तेव्हा त्या पक्षाला देशात कुठेही निवडणूक लढवताना एकच राखीव चिन्ह मिळतं. राष्ट्रीय पक्षांना आपल्या 40 नेत्यांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश करता येऊ शकतो आणि या प्रचारकांच्या प्रवासाचा खर्च उमेदवारांच्या प्रचारासाठीच्या खर्चात मोजला जात नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा किती वर्षात मिळाला -

राष्ट्रवादी काँग्रेसने आपले उमेदवार उभे करण्यासाठी नेहमी बिहार, मेघालय, मणिपूर, लक्षद्वीप, गोवा अशा सुरक्षित आणि लहान राज्यांची निवड केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही 1999 मध्ये झाली होती आणि 2004 मध्ये म्हणजेच पक्षस्थापनेनंतर फक्त पाच वर्षातच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवला.

आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा किती वर्षात मिळाला -

26 नोव्हेंबर 2012 रोजी अरविंद केजरीवाल यांनी 'आम आदमी पार्टी' या राजकीय पक्षाची स्थापना केली. अण्णा हजारे त्यास अनुकूल नव्हते. पण त्यावेळी अरविंद केजरीवाल म्हणाले की, 'सर्व पक्षांनी फसवणूक केली आहे'. पडद्यामागे सर्व पक्ष एकमेकांना मदत करतात. जोपर्यंत राजकारण बदलत नाही, तोपर्यंत भ्रष्टाचारापासून मुक्ती मिळू शकत नाही. म्हणूनच आम्ही आम आदमी पक्षाची स्थापना मजबुरीने केली आहे. पण मजबुरीतून सुरू झालेला आम आदमी पक्ष आज देशाचा राष्ट्रीय पक्ष बनला आहे. देशात सर्वाधिक आमदार असलेल्या काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसनंतर भाजप हा चौथा पक्ष आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल गुरुवारी आले. यामध्ये आम आदमी पक्षाने पाच जागा जिंकल्या. त्यामुळे आम आदमी पक्षाला आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, 'गुजरातच्या जनतेने आम आदमी पार्टीला राष्ट्रीय पक्ष बनवले आहे. गुजरातमध्ये झालेल्या मतांच्या संख्येनुसार, आम आदमी पक्ष अवघ्या 10 वर्षांत देशातील काही राष्ट्रीय पक्षांपैकी एक बनला आहे. म्हणजे आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्ष व्हायला दहा वर्ष लागली.

सध्या आपल्या देशात 7 पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टी, भारतीय काँग्रेस पक्ष, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि नॅशनल पिपल्स पार्टीचा समावेश आहे. आणि आता लवकरच आम आदमी पक्षाचाही राष्ट्रीय पक्षांच्या यादीत समावेश होणार आहे.

First published:

Tags: Aam aadmi party, Arvind kejriwal, NCP, Sharad Pawar