• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • शरद पवार- नितीन गडकरींची दिल्लीत खलबतं, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूचनेनुसार बैठक

शरद पवार- नितीन गडकरींची दिल्लीत खलबतं, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूचनेनुसार बैठक

Sharad Pawar Nitin Gadkari meeting: आहे. या अधिवेशना दरम्यान दिल्लीत अनेक राजकीय हालचाली सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर एक मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट झाली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 30 जुलै: सध्या नवी दिल्लीत (New Delhi) पावसाळी अधिवेशन (Monsoon session of parliament 2021) सुरु आहे. या अधिवेशना दरम्यान दिल्लीत अनेक राजकीय हालचाली सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर एक मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची भेट झाली आहे. शरद पवार आणि नितीन गडकरी या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या सुचनेनुसार ही बैठक (Meeting) झाली आहे. सुत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये संसदेतील गोंधळावर मार्ग काढण्यावर चर्चा झाल्याचं समजतंय. दरम्यान राज्यातील परिस्थितीवरही चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून विरोधक गदारोळ घालत आहेत. त्यामुळे संसदेचं कामकाज होत नसल्याचं दिसून येत आहे. यावरच मार्ग काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नितीन गडकरींना याबाबतची जबाबदारी सोपवली आहे. याचाच एक भाग म्हणून नितीन गडकरींनी शरद पवारांची भेट घेतली आहे. आज सुप्रीम कोर्टात ठरणार अनिल देशमुख यांचं भवितव्य विरोधकांचा गदारोळ दिल्लीत पावसाळी अधिवेशन सुरु आहे. पेगासस हेरगिरी प्रकरणासह इतर मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. विरोधी पक्षांनी घातलेल्या गोंधळामुळे प्रश्नोत्तर, शून्य प्रहराच्या तासाबरोबरच इतर कामकाजही स्थगित झाले. आजचं अधिवेशन कोरोना महामारीवर आज लोकसभेत चर्चा होणार आहे. लोकसभा कामकाज समितीच्या सुधारित अजेंड्यानुसार, एनके प्रेमचंद्रन आणि विनायक राऊत शुक्रवारी देशातील कोविड -19 च्या परिस्थितीचा मुद्दा उपस्थित करतील. पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला राज्यसभेत याविषयी आधीच चर्चा झाली आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published: