Home /News /national /

Sharad Pawar, देवेंद्र फडणवीसांची दिल्लीवारी तर Nana Patole प्रियंका गांधींच्या दारी; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Sharad Pawar, देवेंद्र फडणवीसांची दिल्लीवारी तर Nana Patole प्रियंका गांधींच्या दारी; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Sharad Pawar, Devendra Fadnavis in Delhi: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. त्याच दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सुद्धा दिल्लीत पोहोचले आहेत.

नवी दिल्ली, 16 जुलै: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) आज राजधानी दिल्लीत (Delhi) दाखल झाले आहे. दिल्लीतील 6 जनपथ निवासस्थानी शरद पवार दाखल झाले आहेत. आगामी 19 जुलै पासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित विविध बैठकीमध्ये ते सहभागी होणार आहेत. मात्र, असे असले तरी राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे आणि त्याचे कारण म्हणजे शरद पवार दिल्लीत दाखल झाले असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सुद्धा दिल्लीत पोहोचले आहेत. कालच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. याच दरम्यान आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ही दिल्ली दौऱ्यावर आहेत या सर्वांमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. ...आणि छगन भुजबळ थेट पोहोचले देवेंद्र फडणवीसांच्या घरी महत्त्वाचं म्हणजे राज्याच्या महाविकास आघाडीमध्ये सध्या धुसपुस सुरू आहे. दिल्लीत येण्याच्या पूर्वी शरद पवार यांची राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत जवळपास 30 मिनिटांची बैठक झाली होती. त्यामुळे आज काही काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठी सोबत पवार यांची बैठक होण्याची शक्यता आहे. यासोबतच शरद पवार आज दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेणार आहेत. सायंकाळच्या सुमारास होणाऱ्या या बैठकीत आणखी एक माजी मंत्री देखील उपस्थित राहण्याची माहिती समोर येत आहे. नाना पटोले हे प्रियंका गांधींच्या भेटीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्याने महाविकास आघाडी सरकारमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहेत. त्यातच शरद पवारांनी सुद्धा नाना पटोलेंवर निशाणा साधला होता. त्यानंतर काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील मुंबईत आले होते त्यावेळेस राज्यातील काँग्रेस नेते आणि शरद पवार यांच्यात भेट झाली होती. मात्र, या भेटीपासून नाना पटोले यांना दूर ठेवले होते. यामुळे नाना पटोले आपली नाराजी व्यक्त करणार असल्याचंही बोललं जात आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Devendra Fadnavis, Nana Patole, Sharad pawar

पुढील बातम्या