मराठी बातम्या /बातम्या /देश /मोठी बातमी! शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, या विषयांवर झाली महत्त्वाची चर्चा

मोठी बातमी! शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, या विषयांवर झाली महत्त्वाची चर्चा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. या बैठकीमध्ये जयप्रकाश दांडेगावकर, प्रकाश नाईक नवरे, सुनील तटकरे देखील उपस्थित होते.

नवी दिल्ली, 03 ऑगस्ट: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. या बैठकीमध्ये जयप्रकाश दांडेगावकर, प्रकाश नाईक नवरे, सुनील तटकरे देखील उपस्थित होते. केंद्रीय सहकार मंत्री पदाची धुरा सांभाळल्यानंतर अमित शाह यांनी पहिल्यांदाज आज शरद पवारांची भेट घेतली. या बैठकीत महत्त्वाचे म्हणजे, रायगडमध्ये 'एनडीआरएफ' केंद्राबाबत आणि NDRF च्या काही नियमांमध्ये आवश्यक बदलासंदर्भात चर्चा झाली. या बैठकीतील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे साखरेची विक्री किंमत वाढवण्याची मागणी करण्यात आली.

एकीकडे आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी विरोधी पक्षांना एकत्र करत मोदी सरकारला घेरण्यासाठी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. राहुल गांधी यांनी देशातील विरोधी पक्षांच्या खासदारांची एक बैठक बोलावली होती. राहुल गांधींच्या ब्रेकफास्ट डिप्लोमसीची चर्चा सुरू असतानाच शरद पवार-अमित शहा बैठकीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. राहुल गांधींनी बोलावलेल्या बैठकीत देशातील 14 पक्षांचे जवळपास 100 खासदार उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे.

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे

या बैठकीत साखरेची विक्री किंमत वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच इथेनॉल मिश्रणाला प्रोत्साहन देण्याची मागणी अमित शहांकडे करण्यात आली. यावेळी गृहमंत्र्यांनी अशी माहिती दिली आहे की, लवकरच सरकार इथेनॉलबाबत नवीन धोरण आणण्याच्या विचारात आहे.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रायगडमध्ये एनडीआरएफ केंद्र उभारण्यासाठी आणि पूर आणि वादळातील विनाशापासून सुटका करण्यासाठी एनडीआरएफच्या नियमांमध्ये बदल करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

First published:

Tags: Amit Shah, Sharad pawar