Home /News /national /

हुश्श! भारतातील उन्हाळ्यात नाही टिकणार कोरोना! प्रमुख भारतीय वैज्ञानिकाचा दावा

हुश्श! भारतातील उन्हाळ्यात नाही टिकणार कोरोना! प्रमुख भारतीय वैज्ञानिकाचा दावा

ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी संचालक प्रोफेसर गगनदीप कांग यांनी दिलेल्या माहितीनुसार Coronavirus (COVID-19) वर लस बनवण्यासाठी एक ते दीड वर्षांचा कालावधी लागतो. त्यांची टीम कमीतकमी कालावधीत लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहे.

पुढे वाचा ...
    निखिल घाणेकर, नवी दिल्ली, 04 मार्च : कोरोना व्हायरस (Coronavirus) अर्थात COVID-19 च्या संक्रमणामुळे जगभरात 3 हजार 131 माणसांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये भारतात 3 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. सर्वात पहिल्यांदा केरळमध्ये कोरोना व्हायरसचे संशयित रुग्ण आढळून आले होते. भारतामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारांकडून याबाबत अधिक काळजी घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कोरोनाबाबत अधिक जाणून घेण्यासाठी न्यूज-18 भारतने देशातील प्रमुख वैज्ञानिकांपैकी एक असणाऱ्या प्रोफेसर गगनदीप कांग (Professor Gagandeep Kang) यांच्याशी बातचीत केली. त्यांना कोव्हिड-19 बाबत समोर येणाऱ्या समस्या, व्हायरसचा सामना करण्यासाठी उपलब्ध असणारी संसाधनं आणि या कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे होणारे इतर आजार इ. संदर्भात प्रश्न विचारले. (हे वाचा-दुष्काळात तेरावा महिना! कोरोनाचा सामना कसा करायचा? मुंबईमध्ये मास्कचा तुटवडा) 57 वर्षीय कांग या ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी संचालक आहेत. ही संस्था केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारित येते. गगनदीप या रॉयल सोसायटीच्या फेलो म्हणून निवडल्या गेलेल्या भारतातील पहिल्या महिला आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या सध्या कोलिशन फॉर एपिडेमिक प्रिपरेन्डनेस इनोव्हेशन्स (CEPI) मंडळाच्या सदस्य म्हणून काम पाहतात. यामध्ये उदयोन्मुख संसर्गजन्य रोगांवरील लसींच्या विकासासाठी अर्थसहाय्य आणि समन्वय साधण्यासाठी प्रयत्न केले जातात, सीईपीआय त्यांच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार सार्वजनिक,खाजगी आणि नागरी संस्था यांच्यासह काम पाहते. (हे वाचा-कोरोनाव्हायरसमुळे IPLवर टांगती तलवार! बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती) कांग यांनी दिलेल्या माहितीनुसार CEPI कोरोना वायरसची लस बनवण्यासाठी युनिव्हरसिटी ऑफ क्वीन्सलँड आणि एका अमेरिकन बायोटेत कंपनी मोडेर्नाला निधी उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे 6 आठवड्यात 1 लस तयार झाली आहे. हे काम असाधारण असल्याचं त्या म्हणाल्या. क्लिनीकल ट्रायल आणि जनावरांवर ही लस आधी वापरण्यात येणार आहे. लस बनवण्यासाठी लागणारा एक ते दीड वर्षाचा कालावधी लागतो.  या दोन्ही टीम कमीतकमी कालावधीत लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. अधिक तापमानात कोरोना टिकणार नाही कांग पुढे म्हणाल्या की, चिनने हा व्हायरस रोखण्यात आणि याचा शोध लावण्यात मोठं काम केलं आहे. तसंच वातावरणातील बदलाचा या व्हायरसवर मोठा परिणाम होत असल्याचंही त्या म्हणाल्या. त्यावरूनच निश्चित होतं की, कोणता व्हायरस कोणत्या वातावरणात टिकून राहील. तापमान जास्त असेल तर त्या व्हायरसचा प्रसार आणि प्रभाव थांबवतं. त्यामुळे हिवाळ्यामध्ये अशा विषाणूंचा फैलाव अधिक होतो. कांग शेवटी हे देखील म्हणाल्या की, अनेकांचं असं म्हणणं आहे की, वाढणाऱ्या उन्हाळ्यामुळे कोरोना व्हायरस भारतात टिकणार नाही.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Corona virus, Coronavirus

    पुढील बातम्या