मराठी बातम्या /बातम्या /देश /

गांधी घराण्याच्या विश्वासू नेत्याने केला अध्यक्षपदासाठी अर्ज, या मोठ्या नेत्यांनी दिलं समर्थन

गांधी घराण्याच्या विश्वासू नेत्याने केला अध्यक्षपदासाठी अर्ज, या मोठ्या नेत्यांनी दिलं समर्थन

दिग्विजय सिंह म्हणाले की, खरगेजी माझे वरिष्ठ आहेत. मी काल त्यांच्या निवासस्थानी गेलो आणि सांगितले की, जर ते काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज भरत असतील तर मी अर्ज भरणार नाही.

दिग्विजय सिंह म्हणाले की, खरगेजी माझे वरिष्ठ आहेत. मी काल त्यांच्या निवासस्थानी गेलो आणि सांगितले की, जर ते काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज भरत असतील तर मी अर्ज भरणार नाही.

दिग्विजय सिंह म्हणाले की, खरगेजी माझे वरिष्ठ आहेत. मी काल त्यांच्या निवासस्थानी गेलो आणि सांगितले की, जर ते काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज भरत असतील तर मी अर्ज भरणार नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • New Delhi, India
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : गांधी घराण्याचे विश्वासू सहकारी आणि काँग्रेस पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रवेश केला आहे. ते आणि शशी थरूर शुक्रवारी आपले नामांकन दाखल करतील. तर दिग्विजय सिंह यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून स्वतःला बाहेर काढले आहे. ते आणि अशोक गेहलोत हे खरगे यांचे समर्थक बनले आहेत. खरगे हे निवडणूक लढवत असल्याने ते गांधी घराण्याची निवड असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर दिग्विजय सिंह यांनी खरगे यांच्याविरोधात निवडणूक लढवणार नाही, असे सांगितले.

दिग्विजय सिंह काय म्हणाले -

दिग्विजय सिंह म्हणाले, मी आयुष्यभर काँग्रेससाठी काम केले आहे आणि करत राहीन. दलित, आदिवासी आणि गरीब यांच्या बाजूने उभे राहणे, जातीय सलोखा आणि नेहरू-गांधी कुटुंबाप्रती भक्ती बिघडवणाऱ्यांविरुद्ध आवाज उठवणे या तीन गोष्टींवर मी कधीही तडजोड केली नाही.

दिग्विजय सिंह पुढे म्हणाले की, खरगेजी माझे वरिष्ठ आहेत. मी काल त्यांच्या निवासस्थानी गेलो आणि सांगितले की, जर ते काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज भरत असतील तर मी अर्ज भरणार नाही. तेव्हा त्यांनी नामांकन नाही करत असल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर ते या पदाचे उमेदवार असल्याचे मला मीडियातून समजले. मी त्यांना सांगितले की मी त्यांच्यासोबत उभा आहे आणि त्यांच्या विरोधात लढण्याचा विचारही करू शकत नाही. मी त्याचा समर्थक होईल, असे दिग्विजय सिंह यांनी स्पष्ट केले.

गांधी परिवाराच्या जवळचे -

स्पष्ट प्रतिमा असलेले मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे तगडे नेते आहेत. ते गांधी घराण्याशीही जवळचे आहेत. दलित समाजातून आलेले खरगे यांचे विरोधी पक्षातील नेत्यांशीही चांगले संबंध आहेत. आमदारांच्या बंडखोरीनंतर ते निरीक्षक म्हणून राजस्थानला गेले. मात्र, काँग्रेसमध्ये एक माणूस-एक पद हे तत्त्व असल्याने खरगे काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यास ते राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद सोडतील का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. यापूर्वी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनाही मुख्यमंत्रीपद सोडण्यास सांगण्यात आले होते.

त्याचवेळी अशोक गेहलोत म्हणाले की, मल्लिकार्जुन खरगे यांच्याबाबत आमच्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतला आहे. मी त्यांचा समर्थक होईन. राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदासह सर्वच बाबतीत पक्षाच्या आदेशाचे पालन करणार असल्याचेही गेहलोत म्हणाले.

हेही वाचा - काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट, 10 जनपथमधील भेटीदरम्यान गहलोतांनी मागितली माफी

काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण काँग्रेसने मल्लिकार्जुन खरगे यांना पाठिंबा दिला आहे. लोकशाही पद्धतीने काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे जवळपास सर्वच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खरगे यांचा अर्ज दाखल करण्याकरिता येथे पोहोचले आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांनी आमचे दिल्ली प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्यासोबत खास बातचीत करताना सांगितले.

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी ही निवडणूक होत आहे मध्ये बहुतांश काँग्रेस जणांनी मल्लिकार्जुन खरगे यांना पाठिंबा दिला आहे. खरगे यांच्या पाठीशी सर्व काँग्रेस उभी आहे त्यामुळे खरगे यांचा विजय निश्चित मानला जात आहे, असे मत काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी आमचे दिल्ली प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्यासोबत खास बातचीत करताना सांगितले.

First published:

Tags: Election