जयपूर, 29 सप्टेंबर : राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय संकटादरम्यान मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. साधारण दीड तास ही बैठक सुरू होती. या बैठकीत गहलोत यांच्या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. गेहलोत म्हणाले की, गेल्या 50 वर्षांत अगदी इंदिरा गांधीच्या कार्यकाळातही शिवाय कोणीही पक्षाचा अध्यक्ष असला तरी काँग्रेसने नेहमीच माझ्यावर विश्वास ठेवला. आमदाराच्या त्या बैठकीनंतर अनेकांना धक्का बसला होता. सर्वांना वाटत होतं की, मला मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. या सर्व प्रकरणानंतर मी सोनिया गांधींची माफी मागितली आहे. मुख्यमंत्री कोण होणार, याचा निर्णय सोनिया गांधी घेतील. मी काँग्रेसशी प्रामाणिक आहे. याशिवाय ते काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याचंही त्यांनी जाहीर केलं. ते जेव्हा सोनिया गांधींना भेटायला गेले, तेव्हा त्यांच्या हातात माफीनामा असल्याचंही सांगितलं जात आहे. Rajasthan Congress : वाळवंटात वादळ! काँग्रेसचं आणखी एक राज्य संकटात, गहलोत गटाचे 92 आमदार राजीनाम्याच्या तयारीत त्या दिवशी नेमकं काय घडलं? राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती, यानंतर लगेचच राजस्थानमध्ये काँग्रेससाठी राजकीय संकट उभं राहिलं. गहलोत गटाचे आमदार सचिन पायलट यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या विरोधात होते. सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्यात येत असेल तर आपण सामूहिक राजीनामा देऊ, असा इशारा या आमदारांनी दिल्याचं वृत्त होतं. याशिवाय गहलोत गटातल्या 92 आमदारांनी राजीनाम्यावर सही केल्याचं आमदार प्रतापसिंग खाचरियावास यांनी न्यूज18 शी बोलताना सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.