मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /...म्हणून महिला पोलिसानेच हवालदाराच्या जीवाचा केला सौदा; मुंबईला हादरवणाऱ्या घटनेत नवं वळण

...म्हणून महिला पोलिसानेच हवालदाराच्या जीवाचा केला सौदा; मुंबईला हादरवणाऱ्या घटनेत नवं वळण

मुख्य आरोपी महिला पोलिसासह तिच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे.

मुख्य आरोपी महिला पोलिसासह तिच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे.

Murder in Mumbai: काही दिवसांपूर्वी पनवेल येथील मालधक्का परिसरात झालेल्या अपघातात (Accident) एका हवालदाराचा मृत्यू (Police Constable's death) झाला होता. यानंतर या अपघात प्रकरणाला नवा ट्विस्ट आला आला आहे.

नवी मुंबई, 10 सप्टेंबर: काही दिवसांपूर्वी पनवेल येथील मालधक्का परिसरात झालेल्या अपघातात (Accident) एका हवालदाराचा मृत्यू (Police Constable's death) झाला होता. संबंधित हत्या नसून घातपात असल्याचा संशय कुटुंबीयांकडून व्यक्त केला असता, पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी केली. यानंतर या अपघातात प्रकरणाला नवा ट्विस्ट आला असून संबंधित अपघतात (Plot as accident) नसून हत्या (Police Constable's murder) असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. महिला पोलिसानं सुपारी देऊन अपघात घडवून आणल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी महिला पोलिसासह अन्य दोघांना अटक (Aaccused arrest) केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

शिवाजी माधव सानप असं हत्या झालेल्या पोलीस हवालदाराचं नाव आहे. मृत सानप हे 15 ऑगस्ट रोजी पनवेल रेल्वे स्थानकापासून मालधक्क्याकडे पायी चालले होते. दरम्यान भगत चाळीसमोरून जात असताना एका अज्ञात वाहनानं त्यांना जोरदार धडक दिली. यानंतर सानप यांना जवळच्या  खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. पण हा अपघात नसून घातपात असल्याचं पोलीस तपासात समोर आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका महिला पोलिसासह तिच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.

हेही वाचा-वेगवेगळ्या पुरुषांसह 25 वेळेस घरातून पळाली महिला; मात्र तरीही पती लावतो जीव

शीतल प्रकाश पानसरे, विशाल जाधव आणि गणेश चव्हाण ऊर्फ मुदावथ अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहे. या घटनेचा तपास करत असताना, पोलिसांनी संबंधित परिसरातील अनेक ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. दरम्यान, 15 ऑगस्ट रोजी मृत सानप पनवेल रेल्वे स्थानकातून बाहेर पडले असता, त्यांच्या पाठीमागे सावकाश येणारी एक मोटार आढळली. यानंतर पोलिसांनी सानप लोकलमध्ये कुठून बसले आणि कुठे उतरले याची तपासणी केली. दरम्यान संबंधित मोटार आणि सानप हे कुर्ला येथून पनवेल येथे जाण्याचं निघाल्याचं दिसून आलं आहे. यानंतर पोलिसांनी संबंधित आरोपींची ओळख पटवून त्यांना बेड्या ठोकल्या. शीतल पानसरे यांनी सुपारी दिल्यानं आपण अपघात घडवल्याचं आरोपींनी पोलीस चौकशीत सांगितलं आहे.

हेही वाचा-धक्कादायक! बाप-लेकीच्या वादाचं भयावह रुप; स्वत:च्याच वडिलांची केली हत्या

पोलीस हवालदारावरील तिरस्कारापोटी महिलेनं अपघात घडवून आणल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. यासाठी आरोपी महिला पोलिसानं किती रुपयांची सुपारी दिली होती. हे अद्याप समोर आलं नसून पोलीस याचा तपास करत आहेत. पोलिसांनी तांत्रिक तपास करत गणेशला विकाराबाद तेलंगणा आणि विशाल यास बुलढाण्यातील पडसी बुद्रुक येथील अटक केली आहे. या घटनेचा पढील तपास पोलीस करत आहेत.

First published:
top videos