नवी दिल्ली, 17 जुलै : सोशल मीडियावर काय आणि कधी ट्रेंड होईल हे सांगता येत नाही.सध्या असाच एक ट्रेंड ट्विटरवर वेगाने व्हायरल होतो आहे, #Sareetwitter. या ट्रेंडमुळे साडीचं सौंदर्य, परंपरा यावर बरीच चर्चा होते आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींनीही या ट्रेंडमध्ये त्यांचा साडीतला एक सुंदर फोटो शेअर केला. त्यांचा हा फोटो 22 वर्षं जुना आहे. बनारसी साडी नेसून पूजा करतानाचा प्रियांकांचा हा फोटो सगळ्यांना खूपच आवडला. प्रियांका गांधी यांच्या लग्नातला हा फोटो आहे, असं वाटून सगळ्यांनीच त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या.
Morning puja on the day of my wedding (22 years ago!) #SareeTwitter pic.twitter.com/EdwzGAP3Wt
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) July 17, 2019
(वाचा : भारतासाठी महत्त्वाची बातमी; दहशतवादी हाफिज सईद याला लाहोरमधून अटक!) यावर प्रियांकांनी उत्तर दिलं, माझ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. पण #SareeTwitter साठी मी हा जुना फोटो शेअर केला. माझ्या लग्नाचा वाढदिवस तर फेब्रुवारी महिन्यात असतो. प्रियांका गांधी साडीच्या या ट्रेंडमुळे भलत्याच मूडमध्ये होत्या. त्यांनी रॉबर्ट वाड्रांना टॅग करत विचारलं, ‘क्या तुम अब भी मुझे डिनर के लिए बाहर ले जा सकते हो?’ तुम्ही मला अजूनही डिनरसाठी बाहेर घेऊन जाऊ शकता का ? असा हा गोड प्रश्न होता. का सुरू झाला हा ट्रेंड? बॉलिवूडच्या स्टार्स, राजकीय नेत्या, पत्रकार या सगळ्याजणी या ट्रेंडमध्ये आपले साडीतले फोटो शेअर करतायत. प्रियांका गांधी यांच्यासोबतच शिवसेनेच्या नेत्या प्रियांका चतर्वेदी आणि भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनीही त्यांचे साडीतले फोटो शेअर केले आहेत. हा ट्रेंड सोमवारी सकाळपासूनच सुरू झाला. न्यूयॉर्क टाइम्समध्ये साडीबदद्लचा एक लेख छापून आला होता. यामध्ये साडीची परंपरा, सौंदर्य आणि साडीची शोभा यांचं वर्णन करण्यात आलं होतं. यामध्ये साडीचा वाढता ट्रेंड भाजपमुळे सुरू झाला, असं लिहिलं आहे. 2014 मध्ये भाजपनेच साडीचं जोरदार प्रमोशन केलं, असं त्यांनी यात म्हटलं आहे. पण भारतातले लोक याच्याशी सहमत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीमध्ये निवडणूक लढवनूनही कधीच बनारसी साडी विणणाऱ्या विणकरांकडे लक्ष दिलं नाही. त्यांची परिस्थिती अजून दयनीयच आहे. या लेखानंतर ट्विटरवर #sareetwitter हा ट्रेंड सुरू झाला. ==================================================================================================== मुंबई-अमेरिका विमान प्रवास स्वस्त होणार, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या