Home /News /national /

भारताला हिंदूराष्ट्र घोषित करा, अन्यथा 2 तारखेला जलसमाधी; संत परमहंसांची घोषणा

भारताला हिंदूराष्ट्र घोषित करा, अन्यथा 2 तारखेला जलसमाधी; संत परमहंसांची घोषणा

भारताला हिंदुराष्ट्र घोषित केलं नाही, तर 1 ऑक्टोबरला जलसमाधी घेण्याचा (Sant Param Hans warns central government to announce India as Hindu Rastra) इशारा संत परमहंस यांनी दिला आहे.

    अयोध्या, 26 सप्टेंबर : भारताला हिदूराष्ट्र घोषित केलं नाही, तर 1 ऑक्टोबरला जलसमाधी घेण्याचा (Sant Param Hans warns central government to announce India as Hindu Rastra) इशारा संत परमहंस यांनी दिला आहे. अयोध्येत झालेल्या सतानत धर्मपरिषदेत त्यांनी ही घोषणा केली आहे. आपण 1 ऑक्टोबरपर्यंत केंद्र सरकारला हिंदुराष्ट्र घोषित करण्यासाठी मुदत देत असून जर तसं घडलं नाही, तर 2 ऑक्टोबरला शरयू नदीत जलसमाधी घेणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 1 ऑक्टोबरला मोठी धर्मसंसद 1 ऑक्टोबरला देशभरात एका मोठ्या धर्मसंसदेचं आयोजन करण्यात येणार असून त्यात भारताला हिंदुराष्ट्र म्हणून घोषित केलं जाईल. मात्र तोपर्यंत केंद्र सरकारनं काहीच निर्णय घेतला नाही, तर आपण शरयू नदीत 2 ऑक्टोबरला समाधी घेऊ, अशी घोषणा त्यांनी केली आहे. यापूर्वीही दिला होता इशारा काही महिन्यांपूर्वी संत परमहंस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना एक पत्र पाठवलं होतं. भारताला हिंदुराष्ट्र घोषित केलं नाही, तर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष आत्मदहनाची तयारीदेखील केली होती. मात्र ऐनवेळी पोलिसांनी घटनास्थळी उपस्थिती लावत हा प्रकार रोखला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी केंद्र सरकारला इशारा दिला असून जलसमाधी घेण्याची तयारी केली आहे. हे वाचा - विकृत! बहीण घराबाहेर पडत असल्याचा सणकी भावाला राग, कात्रीने वार करून केलं जखमी काय म्हणाले संत परमहंस ज्याप्रमाणे काश्मीरमध्ये धर्माच्या आधारे घोषणा केल्या जातात, ते पाहता भारताला हिंदु राष्ट्र घोषित केलं नाही, तर हिंदू अल्पसंख्याक होतील. हे टाळण्यासाठी हिंदुराष्ट्राची घोषणा करणे अत्यावश्यक असल्याचं ते म्हणाले. त्यांच्या या घोषणेवर आता सरकार काय पावलं उचलतं, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Ayodhya, Hindu

    पुढील बातम्या