मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /गिरीश महाजनांच्या मनात चांगल्या भावना नसतात, त्यांच्या नजरा वेगळ्या; एकनाथ खडसेंची पुन्हा टीका

गिरीश महाजनांच्या मनात चांगल्या भावना नसतात, त्यांच्या नजरा वेगळ्या; एकनाथ खडसेंची पुन्हा टीका

एकनाथ खडसे विरुद्ध गिरीश महाजन

एकनाथ खडसे विरुद्ध गिरीश महाजन

कधी मला चावट म्हणतात, कधी बदनामी करा म्हणतात. त्यांची परिस्थिती बघता त्यांची मानसिक स्थिती बिघडणं स्वाभाविक आहे. अशी टीका गिरीश महाजन यांनी केली होती.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jalgaon, India

जळगाव, 22 नोव्हेंबर : खान्देशातील मोठे नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातला वाद काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. गिरीश महाजन यांना मुलगा नसल्याचं वक्तव्य एकनाथ खडसेयांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर महाजन यांनी पलटवार केला होता. मला मुलगा नाही, पण दोन मुली आहेत याचा मला आनंद, मात्र खडसेंना मुलगा होता त्याचं काय झालं? खडसेंच्या मुलाने आत्महत्या केली का त्याचा खून झाला हे तपासण्याची गरज आहे, असं खळबळजनक विधान गिरीश महाजन यांनी केलं.

तसेच खडसेंच्या अनेक ठिकाणच्या भानगडी आहेत, चौकशीमध्ये सबळ पुरावे मिळत असल्याने खडसे अस्वस्थ आहेत. खडसे आजकाल काय बोलतायत त्याचं त्यांना भान राहत नाहीये. ते बेभान झाले आहेत. कधी मला चावट म्हणतात, कधी बदनामी करा म्हणतात. त्यांची परिस्थिती बघता त्यांची मानसिक स्थिती बिघडणं स्वाभाविक आहे. मुख्यमंत्री लेव्हलचा माणूस असताना ते काहीही बोलत आहेत, अशी टीकाही गिरीश महाजन यांनी केली होती. यावर आता पुन्हा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांना प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले एकनाथ खडसे -

खान्देशमध्ये अनेक शब्द असे वापरले जातात. चावट शब्द हा त्यापैकीच आहे. गिरीश महाजन यांना का लागावं चावट म्हणणं? मला चावट म्हटलं तर लागत नाही कारण आमच्या इकडे ही बोलीभाषा आहे. गिरीश महाजन यांनी चावट शब्दाचा वेगळा अर्थ काढला. त्यांच्या मनात चांगल्या भावना नसतात. इकडं तिकडं पाहण्याच्या नजरा वेगळ्या असतात, अशी जोरदार टीका एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर केली. तर गिरीश महाजन यांना चावट म्हटल्याचं दुःख वाटलं असेल, तर मी त्यांची माफी मागतो, असेही खडसे म्हणाले.

हेही वाचा - '...तेव्हा गिरीश महाजनांनी माझे पाय धरले', एकनाथ खडसेंचा पुन्हा हल्लाबोल

तर एकाच घरात पदे असतात याची मंत्री महाजन यांना अजून कल्पना आलेली नाही. त्यांच्या पत्नी साधना महाजन गेल्या २५ वर्षे सरपंच, जिल्हा परिषदेच्या सदस्या आणि आता नगराध्यक्षा आहेत. आपल्याच घरात पदे कशाला पाहिजेत. दुसऱ्याला पदे देता आली असती.

एक बोट दुसऱ्याकडे दाखवत असताना चार बोटे आपल्याकडे असतात. साधना महाजन या तुमच्याच कुटुंबातील आहे हे तुम्ही विसरला का? त्यांना २५ वर्षे कशी पदे दिली. दुसऱ्यांना संधी दिली असती ना? दुर्दैवाने गिरीश महाजनांना मुलगा नाही. नाहीतर मुलगा आणि सून दोघांना पदे मिळाली असती आणि कदाचित तेही राजकारणात आले असते अशी टीकाही खडसेंनी याआधी गिरीश महाजन यांच्यावर केली. त्यानंतर यांच्यात जोरदार टीका प्रत्युत्तर सुरू झाले आहे.

First published:
top videos

    Tags: Eknath khadse, Girish mahajan, Jalgaon, Maharashtra politics