कुलू, 3 डिसेंबर: पळून जाऊन लग्न करणाऱ्यांना सुरक्षित (Safest place for couple after love marriage) राहण्यासाठी भारतातील एक जागा प्रसिद्ध आहे. या जागेत जर एखाद्या प्रेमी (Protection to couples) युगुलानं आसरा घेतला, तर त्याच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी त्या गावाकडून घेतली जाते. भारतात लव्ह मॅरेजला अद्यापही लोकमान्यता (Acceptance to love marriage) मिळालेली नाही. त्यातही विशेषतः जर ते आंतरजातीय लग्न असेल, तर घरातल्यांकडून त्याला विरोधच होताना दिसतो. घरच्यांच्या मनाविरुद्ध लग्न केलेल्या जोडप्यावर हल्ला होण्याचे किंवा त्यांना मारहाण होण्याचे प्रकारही घडतात. अशा सर्वांसाठी एक सुरक्षित ठिकाण आहे. जर प्रेमी युगुलानं त्या ठिकाणी आसरा घेतला, तर त्यांच्या केसालाही कुणी धक्का लावू शकत नाही. गावकरी घेतात काळजी हे ठिकाण आहे हिमाचल प्रदेशात. कुल्लू जिल्ह्यातील शंगचूल महादेव मंदिरात जर एखाद्या जोडप्याने आसरा घेतला, तर त्याच्या संरक्षणाची पूर्ण जबाबदारी गावाकडून घेण्यात येते. या गावात पोलिसांना येऊ दिलं जात नाही. त्याचप्रमाणे कुठलंही शस्त्र घेऊन गावात प्रवेश करू दिला जात नाही. या गावात राहणाऱ्या प्रेमी युगुलाच्या केसांनाही धक्का लागू नये, याची काळजी ग्रामस्थ घेतात. प्रेमी युगुलांना जितका काळ या मंदिरात राहायचं आहे, तितका काळ राहण्याची मुभा आहे. हे वाचा- कॉलेजमध्ये शिरून बिबट्याचा विद्यार्थ्यावर हल्ला, समोर आला थरकाप उडवणारा VIDEO प्रथेमागील कारण प्रेमी युगुलांना संरक्षण देण्याच्या प्रथेमागे एक आख्यायिका असल्याचं सांगितलं जातं. कौरव आणि पांडव युद्धाअगोदर या भागात पांडव आले होते. त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी कौरवांची टोळीदेखील इथं आली. त्यावेळी पांडव इथल्या महादेवाच्या मंदिरात लपून बसले होते. त्यांचं संरक्षण करण्यासाठी स्वतः महादेव पुढे आले आणि या मंदिरातील प्रत्येकाच्या संरक्षणाची जबाबदारी आपली असल्याचं कौरवांना सांगितलं. त्यामुळे कौरवांना निराश होऊ परतावं लागलं आणि पांडवांचं संरक्षण झालं.या आख्यायिकेमुळेच गावात येणाऱ्या प्रेमी युगुलाला संरक्षण देण्याची भूमिका गावकऱ्य़ांनी घेतली आहे आणि वर्षानुवर्षे ती पाळली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







