मराठी बातम्या /बातम्या /Viral /कॉलेजमध्ये शिरून बिबट्याचा विद्यार्थ्यावर हल्ला, समोर आला थरकाप उडवणारा VIDEO

कॉलेजमध्ये शिरून बिबट्याचा विद्यार्थ्यावर हल्ला, समोर आला थरकाप उडवणारा VIDEO

अलिगढमधील एका कॉलेजमधील वर्गातच बिबट्या घुसला. बिबट्याने एका विद्यार्थ्यावर हल्ला करत त्याला जखमी केलं.

अलिगढमधील एका कॉलेजमधील वर्गातच बिबट्या घुसला. बिबट्याने एका विद्यार्थ्यावर हल्ला करत त्याला जखमी केलं.

अलिगढमधील एका कॉलेजमधील वर्गातच बिबट्या घुसला. बिबट्याने एका विद्यार्थ्यावर हल्ला करत त्याला जखमी केलं.

नवी दिल्ली 03 डिसेंबर : बिबट्याचं नाव ऐकलं तरी अनेकांचा थरकाप उडतो. बिबट्याचा चपळपणा आणि हुशारी इतर प्राण्यांपेक्षा अतिशय वेगळी असते. बिबट्या पुढच्याच क्षणी काय करेल, याची कल्पनाही कोणी केलेली नसते. आपल्या स्वार्थासाठी माणसं मोठ्या प्रमाणात जंगलतोड करत आहेत. यामुळे अनेकदा बिबट्यासारखे घातक प्राणी रस्त्यावर आणि मानवी वस्त्यांमध्ये फिरताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Leopard Attacked on College Student) होत आहे. या व्हिडिओवर (Shocking Viral Video) लोक निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

जंगलं उद्धवस्त झाल्याने बिबटेही आता मानवी वस्तीत शिरकाव करू लागले आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. इंटरनेटवर व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल. अलिगढमधील एका कॉलेजमधील वर्गातच बिबट्या घुसला. बिबट्याने एका विद्यार्थ्यावर हल्ला करत त्याला जखमी केलं. मात्र, या विद्यार्थ्याचा जीव वाचवण्यात आला.

भारतीय पोलीस सेवा अधिकारी कलानिधी नैथानी यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या फुटेजमध्ये बिबट्या वर्गात फिरताना दिसत आहे. हा बिबट्या वर्गाच्या चारही बाजूंनी फिरताना दिसला आणि त्याने एका विद्यार्थ्याला जखमीही केलं. शाळांचे जिल्हा निरीक्षक धर्मेंद्र शर्मा यांनी एएनआयला सांगितलं की विद्यार्थी जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात नेण्यात आले आणि आता तो पूर्णपणे बरा आहे.

बिबट्याचा हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं, अलिगढच्या एका कॉलेजमध्ये बिबट्या शिरल्याची माहिती मिळताच पोलीस आणि वनाधिकारी बचावासाठी घटनास्थळी पोहोचले. अधिकारी कलानिधी नैथानी यांनी हेदेखील सांगितलं की बिबट्यालाही वाचवण्यात आलं असून कॉलेज परिसरापासून दूर सोडण्यात आलं आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत. एका यूजरने लिहिलं, की देवाच्या कृपेने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

First published:

Tags: Leopard, Shocking video viral