जयपूर, 14 जुलै : गेल्या तीन दिवसांपासून राजस्थानमध्ये राजकीय घडामोडीमुळे वातावरण ढवळून निघाले होते. अखेर बंडाचे झेंडा फडकवणारे सचिन पायलट यांच्यावर काँग्रेसने कारवाईचा बडगा उगारत उपमुख्यमंत्रिपदावरुन दूर केले आहे. काँग्रेसने कारवाई केल्यावरही पायलट यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. भाजपच्या उंबरठ्यावर पोहोचले सचिन पायलट माघारी परतले. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी मनधरणी करण्यास सुरुवात केली. पण, त्यांनी अशोक गहलोत यांना हटवले तरच परत येऊ, अशी भूमिका घेतली. अखेर, पायलट यांनी आपली भूमिका कायम ठेवली. त्यामुळे काँग्रेसने उपमुख्यमंत्रिपदावरुन हटवले. सचिन पायलट यांनी ट्वीट करून काँग्रेसच्या कारवाईला उत्तर दिले. ‘सत्य को परेशान किया जा सकता है पराजित नहीं’ असं म्हणत पायलट यांनी नवे संकेत दिले आहे.
सत्य को परेशान किया जा सकता है पराजित नहीं।
— Sachin Pilot (@SachinPilot) July 14, 2020
दरम्यान, सचिन पायलट यांच्यावर कारवाई होताच भाजपने बैठक बोलावली आहे. भाजपच्या प्रदेश कार्यालयात ही बैठक होत असून या बैठकीला प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया, राष्ट्रीय संघटन मंत्री वी.सतीश, गुलाबचंद कटारिया, उपनेता प्रतिपक्ष राजेंद्र आणि प्रदेश संघटन महामंत्री चंद्रशेखर हजर आहे. या बैठकीमध्ये विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मागण्यावर चर्चा होत आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय उपाध्यक्ष ओम माथुर हे दिल्लीवरुन जयपूरला रवाना झाले आहे. कोरोनाच्या संकटात मुंबईतील डबेवाल्याबाबत पालकमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय तर दुसरीकडे अशोक गहलोत यांनी आधीच फिल्डिंग लावून ठेवली आहे. त्यांनी 105 आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. सचिन पायलट यांच्यावर कारवाई होताच पायलट यांनी राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेण्यासाठी राजभवनावर पोहोचले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजभवनात काँग्रेसच्या आमदारांची परेड होण्याची शक्यता आहे. राजभवनावर गहलोत पोहोचले असून त्यांनी आमदारांचे समर्थन असल्याचे पत्र राज्यपालांकडे सुपूर्द करणार आहे. त्यानंतर राज्यपाल आता काय निर्णय देता हे पाहण्याचं ठरणार आहे.