जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / कोरोनाच्या संकटात मुंबईतील डबेवाल्याबाबत पालकमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

कोरोनाच्या संकटात मुंबईतील डबेवाल्याबाबत पालकमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

कोरोनाच्या संकटात मुंबईतील डबेवाल्याबाबत पालकमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

सध्या देशावर कोरोना महामारीचं भीषण संकट आहे. कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात पसरला आहे. त्यात कोरोनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या मुंबईत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 14 जुलै: सध्या देशावर कोरोना महामारीचं भीषण संकट आहे. कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात पसरला आहे. त्यात कोरोनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या मुंबईत आहे. कोरोनामुळे गेल्या चार महिन्यांपासून राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे जवळपास सर्वच क्षेत्रातील नागरिकांना फटका बसला आहे. त्यात मुंबईतील डबेवाल्यावर तर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली आहे. हेही वाचा… कोरोनाचा कहर! CRPF आणि SRPFच्या 40 जवानांना लागण, रुग्णांनी ओलांडली शंभरी मुंबईतील डबेवाल्यांचं अनेक वर्षांपासून मुंबईकरांशी नातं जुळलं आहे. कोरोनामुळे बेरोजगार झालेल्या डबेवाल्यांसाठी मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी मोठा निर्णय घेतला आहे. डबेवाल्यांना थोडीशी मदत व्हावी, यासाठी त्यांना किराणा सामान तसेच इतर काही महत्त्वाच्या सेवा-सुविधा आणि आवश्यक वस्तू देण्यात येणार आहेत. साधारण 400 पेक्षा जास्त डबेवाल्यांना ही मदत देण्यात येणार असल्याचं पालकमंत्री असलम शेख यांनी सांगितलं आहे. जुलै महिना अखेरपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे बकरी ईद देखील याच कालावधीत आहे. तसेच गणेशोत्सव देखील जवळ येत आहे. बकरी ईद आणि गणेशोत्सवाबाबत आज राज्य सरकारचे मंत्री चर्चा करणार आहेत. त्यानंतर बकरी ईद बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भूमिका स्पष्ट करतील, असंही अस्लम शेख यांनी यावेळी सांगितलं आहे. मुंबईतील लोकल सेवा ऑगस्ट महिन्यात सुरू करण्याचा केंद्र सरकारनं म्हटलं आहे. त्यानुसार केंद्र सरकार याबाबत विचार करेल, राज्य सरकारच्या अंतर्गत हा विषय नसल्याचं अस्लम शेख यांनी सांगितलं आहे. दरम्यान, संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार उडवून दिला आहे. देशातील कोरोनाबाधित रग्णांची संख्या आता 9 लाखांहून जास्त आहे. गेल्या 24 तासांत देशात 28 हजार 498 रुग्ण सापडले तर 553 जणांचा मृत्यू झाला. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता 9 लाख 7 हजार 645 झाला आहे. आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या 3 लाख 11 हजार 565 सक्रीय रुग्ण आहेत. तर 5 लाख 71 हजार 460 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. देशात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त असली तरी आतापर्यंत 23 हजार 727 लोकांचा मृत्यूही झाला आहे. हेही वाचा… पुणे ग्रामीणमध्ये कशी आहे लॉकडाऊनची अंमलबजावणी, जाणून घ्या गावा-गावातील स्थिती भारतानं केवळ 166 दिवसांत 9 लाखांचा आकडा पार केला. जगातील इतर देशांच्या तुलनेत एकाच दिवसात देशात सर्वात जास्त रुग्ण सापडत आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी देशात 28 हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: corona
  • First Published :
जाहिरात
जाहिरात