शरद पवारानंतर आता काँग्रेसही नाराज, उद्धव ठाकरेंच्या निर्णयावर तीव्र आक्षेप

शरद पवारानंतर आता काँग्रेसही नाराज, उद्धव ठाकरेंच्या निर्णयावर तीव्र आक्षेप

  • Share this:

नवी दिल्ली 20 फेब्रुवारी : 'एल्गार' परिषदेचा तपास NIAला देण्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांच्या निर्णयावर नापसंती व्यक्त केली होती. त्यानंतर आता काँग्रेसनेही मुख्यमंत्र्यांच्या एका निर्णयावर नाराजी व्यक्त केलीय. राज्यात NPR लागू करायला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुकूल आहेत. मात्र काँग्रेसने त्याला विरोध केलाय. यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी त्याला तीव्र आक्षेप घेत ठाकरेंना युतीधर्माची आठवण करून दिलीय.

खरगे म्हणाले, हे तीन पक्षांचं सरकार आहे हे उद्धव ठाकरेंनी लक्षात घ्यावं. NPR लागू करायला काँग्रेसचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे त्यांनी सगळ्यांची भूमिका लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. एकतर्फी निर्णय चालणार नाही. महत्त्वाचे निर्णय तिनही पक्षांच्या समन्वय समितीच्या बैठकीतच घेतले जावे असंही त्यांनी म्हटलंय.

तर NPRवर उद्धव ठाकरे यांनी सर्व पैलुंचा विचार करत निर्णय घेतला. त्यावर फेरविचार होणार नाही असं शिवसेनेच्या सूत्रांकडून सांगितलं जातंय. या आधी 'एल्गार' परिषदेचा तपास NIAला देण्यावरून त्यांच्यात मतभेद झाले होते. राष्ट्रवादीने त्याला विरोध केला होता. तर मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या अधिकारात निर्णय घेतला होता.

देवेंद्र फडणवीसांना जामीन मंजूर, गुन्ह्यांची माहिती लपवल्याचं प्रकरण

'एल्गार'वरून काय  झालं राजकारण?

एल्गार परिषदेचा तपास राष्ट्रीय तपास संस्ठेच्या (एनएआय) माध्यमातून करण्याच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये आता नवं राजकारण सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एल्गार परिषदेचा तपास एनआयए माध्यमातून करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयास नाराजी व्यक्त केली आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये एल्गार परिषदेचा तपास एनआयए देण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एल्गार परिषदेचा तपास एनआयएच्या माध्यमातून करण्यास परवानगी दिल्यानंतर महाविकास आघाडीतील दोन मित्र पक्षांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. एल्गार परिषदेचा तपास करताना त्यांचा अपराध नाही त्यांच्यावर ही गुन्हे दाखल केले आहेत.

शिवजयंतीच्या मिरवणुकीला औरंगाबादमध्ये गालबोट, तरुणाची भोसकून हत्या

विनाकारण अनेकांना या प्रकरणात गुन्हे दाखल केले आहेत राज्यातील विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) समांतर तपास करावा यासाठी आग्रही आहे. तत्कालीन गृहमंत्री यांनी पोलिसांवर दबाव वाढवत यात काही जणांना गुंतवले आहे का, हे भविष्यात स्पष्ट होईल. अशा स्वरूपात भूमिका अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली आहे तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी जोरदार प्रसिद्धीसाठी तपास एनआयए करणे म्हणजे राज्यातील पुरोगामी अनेकांवर विनाकारण अन्याय होणार नाही ना, असा सूर लावला आहे.

First published: February 20, 2020, 1:23 PM IST

ताज्या बातम्या